वटवृक्ष मंदिरात भागवत कथेस प्रारंभ...! ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराजांनी भागवत कथेतून केले धर्म प्रबोधन.
![]() |
वटवृक्ष मंदिरात भागवत कथेप्रसंगी निरूपण करताना सुधाकर महाराज इंगळे व सहकारी दिसत आहेत. |
प्रतिनिधी - अक्कलकोट,(शब्दांकन -श्रीशैल गवंडी.)
यंदाच्या अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भागवत कथेस येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मोठ्या भक्ती भावाने सुरुवात झाली. कथेच्या प्रारंभी स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने अवघे वटवृक्ष मंदिर स्वामींच्या नाम गजराने दुमदुमले. सोलापूरचे सुप्रसिद्ध वारकरी संप्रदाय कथाकार ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराजांनी याप्रसंगी श्रीमद् भागवत कथेतून धर्म प्रबोधन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिर समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे व सहकाऱ्यांचे स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केले.
या कथेप्रसंगी निरूपण करताना ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी भागवताचा एक अर्थ आहे - भगवतः इदं भागवतम् - म्हणजे भगवंतांचे स्वरूप दर्शविणारे शास्त्र, भगवत् तत्त्वाचा निर्देश करणारे शास्त्र. जी व्यक्ति भगवंताची होते तिलाही भागवत म्हणतात. ह्याचा अर्थ असा झाला - भगवत्तत्त्व, ते जाणण्याचे साधन (ग्रंथ श्रवण) व ते जाणनारी व्यक्ती या सर्वांना ’भागवत’ म्हटले आहे. भागवतकथा अर्थात् ’श्रीमद् भागवत महापुराण्’ ही भगवंतांची वाङ्मयी मूर्ति आहे. हे स्वतः भगवंतांनीच सांगितले आहे. या प्रस्तावनारूपी महात्म्यात म्हटले आहे - कालव्यालमुखग्रास त्रासनिर्णाय हेतवे श्रीमद्भागवतं शास्त्रं कलौ कीरेणे भाषितम्. संसारातील भय दुःख यांचा समूळ नाश करणार्या अमृताचे नाव आहे श्रीमद्भागवत. मन शुद्ध करणारे याच्यापेक्षा चांगले साधन वा शास्त्र नाही. कारण पुढच्याच श्लोकात म्हटले आहे - जन्मान्तरे भवेत् पुण्यं तदा भागवतं लभेत् - अनेक जन्मांच्या पुण्याईने भागवत श्रवणाची संधी प्राप्त होते. एवढी याची थोरवी. श्रीशुकदेव भागवत कथा राजा परीक्षिताला सांगणार आहेत हे देवांना कळल्यावर ते लगेच अमृतकुंभ घेऊन आले आणि श्रीशुकदेवांना म्हणाले या अमृत परीक्षिताला द्या म्हणजे तूर्त त्याचा मृत्यू टळेल आणि त्या बद्दल्यात आम्हाला ही कथा द्या. शुकदेव म्हणाले - कुठे काचेच्या तुकड्याची बरोबरी तुम्ही हिरे-माणिकांबरोबर करताय ? एवढे भागवताचे महत्त्व आहे. ज्याला समजले, उमजले तोच याचे प्राशन करणार. मन्दा सुमन्दमतयोः वा सांसारिक भोगांत सुख शोधणारे, त्यातच गुरफटलेले यांना कळेणे कठीण आहे. ज्याने प्रेयसाचे फोलपण आणि श्रेयसाचे महत्त्व जाणले आहे, जो विरक्त झाला आहे तोच भागवतामृताचा स्वाद घेण्यास वळणार. असे निरूपण याप्रसंगी ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराजांनी केले. याप्रसंगी मंदिर समितीचे मोहनराव पुजारी, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, मोहन जाधव, संतोष पराणे, स्वामीनाथ लोणारी, काशिनाथ इंडे, रवीराव महिंद्रकर, गणेश इंगळे, शिवाजी गुजर, आदि सह भाविक भक्त उपस्थित राहून या भागवत कथा श्रवणाचा लाभ घेतले.

-----------------------------------
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240