SR सोशल फाउंडेशनच्या वतीने साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

प्रतिनिधी - सोलापूर
शस्त्राच्या बळावर जगात अनेक क्रांत्या झाल्या.. पण पेनाच्या बळावर विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरानीं या भारत देशाचा इतिहास बदलला... साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनीही शस्त्र हाती न घेता पेनाच्या बळावर इतिहास निर्माण केला.समाजातील शोषित,पिडीत, मागासवर्गीय, वंचित, कामगार या लोकाचें दुःख, दारिद्रय, विषमता, जातीवाद, वर्णवाद आपल्या साहित्यातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जगाच्या वेशीवर टांगण्याचे काम केले... अशा जगविख्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
प्रथमता: साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन SR सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष पात्रे व ऋषी माळशिकारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी PB ग्रुपचे प्रमुख गौतम(महाराज)चंदनशिवे,SR सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश रणदिवे,रवी सकट,लखन गवळी,शिरीष गायकवाड,विनय क्षीरसागर, साहिल पवार,मयूर कसबे,अभय क्षीरसागर,प्रतीक चंदनशिवे, तुषार पात्रे,चेतन धाकतोडे आदी उपस्थित होते.
-----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०



Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर