राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती कोअर कमिटी ची स्थापना करणार-यशवंत पवार.

 


सोलापूर - प्रतिनिधी 
पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या विकासासाठी उत्कर्षांसाठी न्याय हक्कासाठी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न देखील राज्य सरकार कढून सोडवले  जात आहेत  त्याच बरोबर राज्यातील पत्रकारांचे काही विषय प्रलंबित असून
जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना.
राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी.
यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती.
राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता.
प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा.
पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना.
अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे.
पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे.
पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती देणे.
खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी.
पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण...
यासह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती प्रभावी पणे काम करत असून अनेक वेळा पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलन उपोषण निवेदन व पत्रव्यवहार करत आहे  राज्यातील पत्रकारांचे प्रश्न राज्य सरकारकडे प्रलंबित असून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकार सुरक्षा  लवकरच कोअर कमिटी ची स्थापन करणार असून ज्यात अनेक दैनिकांचे विविध चॅनल  व साप्ताहिक मधील संपादक तसेच तज्ज्ञ पत्रकारांचा समावेश असेल..
राज्यातील पत्रकारांचे प्रश्न  सोडवण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती लवकरच कोअर कमिटी ची स्थापना करणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी प्रसार माध्यमाना दिली आहे.
-----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०



Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर