स्वामी समर्थांचे आशीर्वाद आमच्यासाठी मोलाचे - मा.आमदार चव्हाण.
![]() |
वटवृक्ष मंदिरात मा.आमदार चव्हाण यांचा सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत. |
प्रतिनिधी - अक्कलकोट
आई तुळजाभवानी प्रमाणे श्री स्वामी समर्थ हे पण महाराष्ट्राचे आराध्य दैवतच आहेत. सर्व स्वामी भक्तांप्रमाणे मी व माझे कुटुंबीय ही श्री स्वामी समर्थांचे भक्त आहोत. त्यामुळे स्वामी समर्थांचे आशीर्वाद आमच्यासाठी लाखमोलाचे आहेत असे प्रतिपादन माजी मंत्री व तुळजापूरचे माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी मधुकरराव चव्हाण यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी माजी आमदार चव्हाण बोलत होते. पुढे बोलताना मा.आमदार चव्हाण यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीस महेश इंगळे यांचे सारखे कार्य कुशल व्यक्तिमत्व लाभल्याने वटवृक्ष मंदिराचा विकासात्मक कायापालट झालेला दिसत आहे. यापुढेही महेश इंगळे यांनी मंदिर समितीच्या प्रमुख पदाच्या माध्यमातून वटवृक्ष मंदिर समितीचा कारभार मोठ्या जोमाने पार पाडावा असे मनोगत व्यक्त करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, संतोष जमगे, स्वामीनाथ लोणारी, काशिनाथ इंडे आदी उपस्थित होते.
-----------------------------------
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240