Posts

कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनमध्ये करिअर मार्गदर्शन शिबीर.

Image
  प्रतिनिधी - अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित कै. कल्याणराव इंगळे पॉलिटेक्निकमधे इ.१० वी व १२ वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन महेश इंगळे व प्राचार्य श्री एन.बी.जेऊरे यांनी दिली. दि.१ जून पासून इ. १० उत्तीर्ण विध्यार्थ्यांकरीता डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. ही प्रवेशप्रक्रिया ३० जून पर्यंत सुरु राहणार आहे. महाविद्यालयात विध्यार्थ्यां साठी शासनमान्य अधिकृत सुविधा केंद्राद्वारे मोफत नोंदणी व अर्जस्वीकृतीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंगळवार दि.२७ जून रोजी पॉलिटेक्निकच्या सभागृहात इ.१० वी व १२ वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षण प्रवेश प्रक्रिया व तंत्रशिक्षण क्षेत्रातील विविध संधी याबद्दल मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सोलापूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले हे मार्गदर्शन करणार आहेत.  या शिबिरासाठी अक्कलकोट शहर व परिसरातील विध्यार्थी व पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन ...

प्रसन्न आत्मीयतेवर स्वामी समर्थांचे वरदहस्त - मा.न्यायमुर्ती दिलीप भोसले.

Image
माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांचा वटवृक्ष मंदिरात सपत्निक सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत. प्रतिनिधी - सोलापूर श्री स्वामी समर्थांच्या भक्तीने मन अत्यंत प्रसन्न होते. त्यांच्या नामस्मरणाने आपल्या आत्मीयतेला सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे प्रसन्न चित्ताने स्वामी भक्तीचा आनंद घेता येतो.  म्हणून आमच्या प्रसन्न आत्मीयतेवर स्वामी समर्थांचे वरदहस्त नेहमीच असल्याचे मनोगत अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्निक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी न्यायमुर्ती भोसले बोलत होते.  याप्रसंगी अक्कलकोटचे न्यायाधीश बाळासाहेब गायकवाड,ॲड.अनिल मंगरुळे, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस उपनिरीक्षक श्री पुजारी, स्वप्नील मोरे, अविनाश सुरवसे, धनु राठोड,मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटग...

महेश इंगळेंच्या नेतृत्वाखाली वटवृक्ष मंदिराची आध्यात्मिक विकासाकडे वाटचाल - नानाभाऊ पटोले

Image
नानाभाऊ पटोले व कुटूंबियांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना सिद्धाराम म्हेत्रे व अन्य दिसत आहेत. प्रतिनिधी-अक्कलकोट राज्यातील एक महत्वाचे तिर्थक्षेत्र म्हणून अक्कलकोटचे नावलौकीक आहे. या नावलौकीकाला साजेसे कार्य म्हणजे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात अनेक विकासाभिमुख कामाच्या माध्यमातून बदल झाल्याने भाविकांचा स्वामी दर्शनाकडे कल वाढलेला आहे. याचे सर्व श्रेय मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांना आहे. आध्यात्माची वातावरण निर्मिती कशाप्रकारे करावी त्याचे कौशल्य महेश इंगळे यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांचे हे कार्य हिंदू धर्मातील अध्यात्माला विकासभिमुख दिशा देणारी आहे. त्यामुळे स्वामी समर्थांच्या भक्तांची संख्या वाढत चाललेली आहे, म्हणून महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली वटवृक्ष मंदिराची आध्यात्मिक विकासाकडे यशस्वी वाटचाल चालू असल्याचे मनोगत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन मनोभावे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन न...

भाजप पदाधिकाऱ्यांचा युवासेनेत प्रवेश.

Image
भाजप पदाधिकाऱ्यांचा युवासेनेत प्रवेश. प्रतिनिधी- सोलापूर शिवसेना पक्ष प्रमुख मा.उद्धवजी ठाकरे  व युवासेना प्रमुख मा.आदित्यजी ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन युवासेना सचिव मा.वरूणजी सरदेसाई यांच्या मार्गदर्शना खाली युवासेना विस्तारक मा.उत्तम आयवळे,शिवसेना जिल्हाप्रमुख मा.अमर पाटील व युवासेना जिल्हाप्रमुख मा.बालाजी चौगुले यांच्या उपस्थितीत दक्षिण तालुक्यातील माळकवटा येथील भाजपाचे ग्रामपंचायत सदस आनंदकुमार थोरात,दयानंद कोळी,युवराज बगले,वाघेश राठोड, महेश मिरेकोठ,शेखर पाटील,अविनाश तोडकरी यांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी युवासेनेत प्रवेश केला. यावेळी आ. हो. विद्यापीठ कक्ष अध्यक्ष लहुजी गायकवाड, दक्षिण तालुका प्रमुख धर्मराज बगले,दक्षिण विधानसभा अध्यक्ष राहुल गंधूरे,सोशल मीडिया प्रमुख अजित स्वामी यांच्यासमवेत युवसैनिक मोठ्या संख्येने पस्थित होते. ------------------------------------ ▪️जनता संघर्ष न्यूज ▪️ संपादक-सिध्दार्थ भडकुंबे ▪️ बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

बाळकृष्ण सदाफुले यांचा श्री वटवृक्ष देवस्थानच्या वतीने सत्कार.

Image
प्रतिनिधी- अक्कलकोट सोलापूर येथील माहिती अधिकार महासंघाचे जिल्हा उप प्रचार प्रमुख तथा पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा संघटक सर्वसामान्य माणसाला माहिती अधिकार समजून प्रशासन मधील शासकीय माहिती जनतेला मिळवून देऊन त्यांचे मूलभूत हक्क मिळावेत यासाठी नेहमीच प्रयत्न करणारे बाळकृष्ण सदाफुले यांचाअक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ देवस्थान वतीने देवस्थान चे विश्वस्त श्री.महेश गोगी यांच्या शुभहस्तेश्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन स्वामी समर्थ देवस्थान मधील कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार,सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख,पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर समन्वयक व माहिती अधिकार महासंघाचे सोलापूर जिल्हा संघटक श्रीकांत कोळी, दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद, जनता संघर्ष न्यूजचे संपादक सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट येथील युवा पत्रकार गणेश भालेराव आदी उपस्थित होते. ------------------------------------ ▪️जनता संघर्ष न्यूज ▪️ संपादक-सिध्दार्थ भडकुंबे ▪️ बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०