कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनमध्ये करिअर मार्गदर्शन शिबीर.
प्रतिनिधी - अक्कलकोट
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित कै. कल्याणराव इंगळे पॉलिटेक्निकमधे इ.१० वी व १२ वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन महेश इंगळे व प्राचार्य श्री एन.बी.जेऊरे यांनी दिली. दि.१ जून पासून इ. १० उत्तीर्ण विध्यार्थ्यांकरीता डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. ही प्रवेशप्रक्रिया ३० जून पर्यंत सुरु राहणार आहे. महाविद्यालयात विध्यार्थ्यां साठी शासनमान्य अधिकृत सुविधा केंद्राद्वारे मोफत नोंदणी व अर्जस्वीकृतीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मंगळवार दि.२७ जून रोजी पॉलिटेक्निकच्या सभागृहात इ.१० वी व १२ वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षण प्रवेश प्रक्रिया व तंत्रशिक्षण क्षेत्रातील विविध संधी याबद्दल मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सोलापूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले हे मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरासाठी अक्कलकोट शहर व परिसरातील विध्यार्थी व पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन महेश इंगळे व प्राचार्य एन.बी.जेऊरे यांनी केले आहे.
----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240