बाळकृष्ण सदाफुले यांचा श्री वटवृक्ष देवस्थानच्या वतीने सत्कार.
प्रतिनिधी-अक्कलकोट
सोलापूर येथील माहिती अधिकार महासंघाचे जिल्हा उप प्रचार प्रमुख तथा पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा संघटक सर्वसामान्य माणसाला माहिती अधिकार समजून प्रशासन मधील शासकीय माहिती जनतेला मिळवून देऊन त्यांचे मूलभूत हक्क मिळावेत यासाठी नेहमीच प्रयत्न करणारे बाळकृष्ण सदाफुले यांचाअक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ देवस्थान वतीने देवस्थान चे विश्वस्त श्री.महेश गोगी यांच्या शुभहस्तेश्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन स्वामी समर्थ देवस्थान मधील कार्यालयात सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार,सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख,पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर समन्वयक व माहिती अधिकार महासंघाचे सोलापूर जिल्हा संघटक श्रीकांत कोळी, दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद, जनता संघर्ष न्यूजचे संपादक सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट येथील युवा पत्रकार गणेश भालेराव आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240