महेश इंगळेंच्या नेतृत्वाखाली वटवृक्ष मंदिराची आध्यात्मिक विकासाकडे वाटचाल - नानाभाऊ पटोले


नानाभाऊ पटोले व कुटूंबियांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना सिद्धाराम म्हेत्रे व अन्य दिसत आहेत.

प्रतिनिधी-अक्कलकोट

राज्यातील एक महत्वाचे तिर्थक्षेत्र म्हणून अक्कलकोटचे नावलौकीक आहे. या नावलौकीकाला साजेसे कार्य म्हणजे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात अनेक विकासाभिमुख कामाच्या माध्यमातून बदल झाल्याने भाविकांचा स्वामी दर्शनाकडे कल वाढलेला आहे. याचे सर्व श्रेय मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांना आहे. आध्यात्माची वातावरण निर्मिती कशाप्रकारे करावी त्याचे कौशल्य महेश इंगळे यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांचे हे कार्य हिंदू धर्मातील अध्यात्माला विकासभिमुख दिशा देणारी आहे. त्यामुळे स्वामी समर्थांच्या भक्तांची संख्या वाढत चाललेली आहे, म्हणून महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली वटवृक्ष मंदिराची आध्यात्मिक विकासाकडे यशस्वी वाटचाल चालू असल्याचे मनोगत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटुंब भेट देऊन मनोभावे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली मा.गृहराज्यमंत्री व मा.आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी नानाभाऊ पटोले व कुटुंबीयांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना पटोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुढे बोलताना पटोले यांनी वटवृक्ष मंदिर समिती ही आध्यात्मिक विकासाची कास धरून चालत असल्याने येणाऱ्या अनेक पिढ्यांकरिता मंदिर समितीचे हे कार्य आदर्शवत आहे. मंदिर समितीच्या या आध्यात्मिक विकास कार्याच्या माध्यमातूनच अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासाची खऱ्या अर्थाने येथूनच सुरुवात झाली असल्याचे मनोगत ही व्यक्त केले. याप्रसंगी कांग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, मा.आमदार विश्वनाथ चाकोते, ताईसाहेब पटोले, प्रियांका पटोले, राहुल पटोले, शीतलताई म्हेत्रे, प्रथमेश म्हेत्रे, शंकर मालक म्हेत्रे, शहर कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष रईस टीनवाला, अशपाक बळोरगी, अरुण जाधव, लाला राठोड, सद्दाम शेरीकर, काकासाहेब कुलकर्णी, मंदीर समितीचे विश्वस्त महेश गोगी, भीमाशंकर जमादार, विजयकुमार हत्तुरे, आनंदराव सोनकांबळे, सुधीर लांडे, अभिराज शिंदे, भीमरावर बाळगे, रमेश हसापुरे, चांद आळंद, शिवराज स्वामी, संजय विभूते, विश्वनाथ हडलगी, शिवशरण इचगे, बाबा पाटील, फारुख बबरची, अशपाक अग्सापुरे, विनीत पाटील, शादिद वळसंगकर, लखन तांबोळी, रामचंद्र समाणे, सिध्दार्थ गायकवाड, मैनुद्दिन कोरबू, मुबारक कोरबू, सर्फराज शेख, महिबूब फरास, नंदू स्वामी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

-----------------------------------

▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे

▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०





 

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर