प्रसन्न आत्मीयतेवर स्वामी समर्थांचे वरदहस्त - मा.न्यायमुर्ती दिलीप भोसले.
![]() |
माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांचा वटवृक्ष मंदिरात सपत्निक सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत. |
प्रतिनिधी -सोलापूर
श्री स्वामी समर्थांच्या भक्तीने मन अत्यंत प्रसन्न होते. त्यांच्या नामस्मरणाने आपल्या आत्मीयतेला सकारात्मक ऊर्जा मिळते. त्यामुळे प्रसन्न चित्ताने स्वामी भक्तीचा आनंद घेता येतो. म्हणून आमच्या प्रसन्न आत्मीयतेवर स्वामी समर्थांचे वरदहस्त नेहमीच असल्याचे मनोगत अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्निक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी न्यायमुर्ती भोसले बोलत होते.
याप्रसंगी अक्कलकोटचे न्यायाधीश बाळासाहेब गायकवाड,ॲड.अनिल मंगरुळे, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस उपनिरीक्षक श्री पुजारी, स्वप्नील मोरे, अविनाश सुरवसे, धनु राठोड,मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, निलेश पवार, प्रभाकर जाधव, मोहन जाधव इत्यादी उपस्थित होते.
-----------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240