Posts

Showing posts from March, 2025

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

Image
  प्रतिनिधी -सोलापूर  सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आज मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने रमजान सणानिमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी "मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमाजन निमित्तानं होणारी 'इफ्तार पार्टी' म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे. या प्रंसगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम  उपस्थित होते सदर कार्यक्रमाप्रसंगी माननीय कुलदीप जंगम यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख यांना खजूर भरवून रोजा सोडणेत आला.  याप्रंसगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, प्रसाद मिरकले,अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, संतोष कुलकर्णी,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी. के. देशमुख  मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष सुर्यकांत पाटील  ,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे,  सुर्यकांत मोहिते, अनिल जगताप, सुहास चेळेकर, कामगार नेते अशोक इंदापुरे,राज्य उपाध्यक्ष महसुल कर्मचारी संघटना शंतनु गायकवाड, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष रणजित थिटे ,नागेश भाकरे, जुनी पेन्शन संघटनेचे ...

मराठा सेवा संघाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वटवृक्ष मंदिरात महेश इंगळे यांच्या हस्ते राहुल शिंदे यांचा सन्मान.

Image
 राहूल शिंदे यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, तम्मा शेळके, आत्माराम घाटगे, अतुल जाधव, डॉ.बिराजदार व अन्य दिसत आहेत. प्रतनिधी -अक्कलकोट   मराठा सेवा संघाच्या अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडी प्रित्यर्थ येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व मराठा समाजाचे प्रतिष्ठित नागरिक, मा.नगरसेवक महेश इंगळे यांनी राहुल शिंदे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी बोलताना राहुल शिंदे यांनी आपण नेहमी मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीत सक्रिय रहावे म्हणूनच सेवा संघाने आपणावर ही जबाबदारी सोपवली आहे. ती आपणा सर्वांना सोबत घेऊन पार पाडू हीच सदिच्छा व्यक्त करून स्वामी चरणी प्रार्थना करीत असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रथमेश इंगळे, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब मोरे, संजय पवार, तम्मा शेळके, अतुल जाधव, डॉ.बिराजदार, विपूल जाधव, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, प्रसाद सोनार,...

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर विभागात उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार.

Image
प्रतिनीधी- मुरुम महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आयोजित करिअर कट्टा अंतर्गत वर्षभरात केलेल्या सक्रिय उपक्रमाबद्दल धाराशिव जिल्ह्यातील प्रथम तसेच छत्रपती संभाजीनगर विभागात चार जिल्ह्यातून  उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालय म्हणुन विशेष प्रमाणपत्र आणि स्मृती चिन्ह देऊन देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, करिअर कट्टा  प्रमुख यशवंत शितोळे, प्राचार्य प्रवर्तक डॉ संजय खरात, पुणे,  विभागीय समन्वयक  प्राचार्य डॉ भारत खंदारे, प्राचार्य हरिदास विधाते यांच्या हस्ते प्राचार्य डॉ संजय अस्वले यांना सन्मानित केले. छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी  महाविद्यालयातील रविन्द्रनाथ टागोर सभागृहात करिअर कट्टा विभागीय स्तरावरील बक्षीस वितरण सोहळा आणि NEP एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी विभागीय समन्वयक डॉक्टर राजेश लहाने सह समन्वयक डॉक्टर कुरपुटवार जिल्हा समन्वयक पेरके मॅडम यांची उपस्थिती होती करिअर कट्टा अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास सेंटर ऑफ  एक्सेलन्स A+ दर...

जिल्हा परिषद आवारात घुमणार पक्षांचा आवाज,जि.प. मराठा सेवा संघाने केली पक्षांना पाण्याची सोय.

Image
  प्रतिनिधी -सोलापूर  कडाक्याच्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून, या दिवसात पक्षी पाण्यासाठी वणवण हिंडत असतात. त्यामुळे मराठा सेवा संघाने जिल्हा परिषद आवारातील बागेत पक्षासाठी पाण्याची सोय केली आहे.तसेच काँक्रीटच्या जंगलामध्ये चिमन्यांना घर करणे शक्य नाही यासाठी कृत्रीम घरटे तयार केले आहेत , तसेच सर्वानी पक्षासाठी पाण्याची सोय करावी असा रंगपंचनीनिमीत्त संदेश दिला.यामुळे जिल्हा परिषद आवारात पक्षांचा आवाज घुमणार आहे. मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद च्या वतीने पक्षांना पाण्याची सोय करणेत आली आहे.  त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कुलदीप जंगम , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर , मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे यांचे शुभहस्ते करणेत आले . सदर प्रसंगी अनुपमा पडवळे, राजश्री कांगरे,वेशाली शिंदे, स्मिता पोरेड्डी, शितल कडलासकर , राजश्री रोजी, अनिता तुपारे, प्रियंका डांगे, स्मिता चव्हाण, अंजली पेठकर, आरती माढेकर, सविता मिसाळ, गौरी कदम, राणी तवटी, छाया क्षीरसागर, श्रीदेवी माने, अर्चना निराळी, सुवर्णा पंगुडवाले, भारती उमराणी, मराठा सेवा संघ जि प श...

दक्षिण सोलापूरचे लोकनेते,माजी मंत्री कै.आनंदराव देवकते यांच्या जयंतीनिमित्त राजूर येथे अभिवादन.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  राज्याचे माजी कैबिनेट मंत्री आनंदराव देवकते यांनी आपल्या कार्यकाळात दक्षिण सोलापूरचा सर्वांगीण विकास केला आहे.  त्यांनी राजकारणाबरोबरच समाजकारणावरही विशेष भर दिला होता. समाजातील अनेक घटकांना त्यांनी विकासाच्या प्रवाहात आणले होते. नाही रे वर्गातील अनेक युवकांना राजकारणात आणून त्यांना मोठी पदे मिळवून दिली होती. जनतेच्या प्रश्नासाठी ते नेहमीच लढत राहिले. असे प्रतिपादन माजी आमदार दिलीप माने यांनी केले.राजूर या देवकते यांच्या जन्म गावी त्यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माने बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर माजी सभापती भीमाशंकर जमादार, अशोक देवकते, कस्तुराबाई शेळके,जगदेवी देवकते, सुभाष देवकते, सतीश देवकते, राहुल देवकते, अरुण देवकते, आप्पासाहेब काळे, गंगाधर बिराजदार, प्रथमेश पाटील, राधाकृष्ण पाटील, विजयकुमार मुलगे, पंडित बुळगुंडे, आमसिध्द बुळगुंडे, भारत बनसोडे, शिवपुत्र खांडेकर, हनुमंतराव बिराजदार, कृष्णप्पा बिराजदार, रामचंद्र बिराजदार, शिवानंद यलगोंडे, लक्ष्मण कोळी, मल्लिकार्जुन बुळगुंडे, दादा ठाकरे आदी उपस्थित होते. माने पु...

छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमध्ये मधमाशी पालन प्रशिक्षण.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  युगंधर फाउंडेशन सोलापूर आणि छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज यांच्या वतीने मधमाशी पालन प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक 10 मार्च ते 14 मार्च दरम्यान करण्यात आले आहे. युगंधर फाउंडेशन सोलापूर आणि सीबीआरटीआय पुणे यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रात इतर ठिकाणी मधमाशी पालन प्रशिक्षण वेळोवेळी आयोजित करण्यात येते . शेतीसाठी उत्तम जोडधंदा आणि ग्रामीण भागातील युवकांसाठी उत्तम व्यवसाय संधी म्हणून मधमाशी पालन करणे हे आवश्यक आहे असे मत या कार्यशाळेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मधुकर पवार यांनी व्यक्त केले. मधमाशी ही जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक आहे तसेच अन्नसाखळीतील परागीभवन या महत्त्वाच्या क्रियेमध्ये मधमाशीचा सर्वात महत्त्वाचा रोल आहे.  त्यामुळे मधमाशीचे पालन करून आपण त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करू शकतो असे मत युगंधर फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राध्यापिका रेश्मा माने यांनी मांडले. पाच दिवसीय प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना मधमाशी पालनासाठी आवश्यक असणारे मधमाशीचे जीवन चक्र मधमाशी पालनासाठी लागणारे साहित्य मधमाशी पालनातून तयार होणारे उत्पादन...

दैनिक लोकशाही मतदार वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान.

Image
सोलापूर (प्रतिनिधी) जगभरात महिला आजच्या घडीला कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीत याचे प्रत्यय नेहमीच आपल्याला येत असते सामाजिक शैक्षणिक प्रशासन पासून ते राजकीय तसेच सत्ता चालविण्या पर्यंत महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना पाहायला मिळते देशभरात ८ मार्च हा दिवस जागतिक महिलादिन म्हणून साजरा करण्यात येतो विविध ठिकाणी विविध उपक्रमांनी महिलादिन साजरा केला जातो संघर्षवादी महिलांचा सन्मान केला जातो महिला या कुटुंबाची मोठी व महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असताना कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष निर्भिडपणे काम करत आहेत त्याच अनुषंगाने सोलापुरात सामाजिक राजकीय शैक्षणिक तथा विविध क्षेत्रात काम करत आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी जेणेकरून त्यांना काम करण्यासाठी नव्याने आणखी ऊर्जा मिळेल यासाठी दैनिक लोकशाही मतदार वतीने "नारी शक्तीचा" सन्मान या कार्यक्रमाचे दैनिक लोकशाही मतदार चे मुख्य संपादक अक्षय बबलाद यांच्या उपस्थितीत समाज कल्याण हॉल येथे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीमाई माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण क...

राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार साठी प्रस्ताव पाठविण्याचे बसव प्रतिष्ठानचे आवाहन..

Image
प्रतिनिधी - मुरूम ता.,  क्रांतिसूर्य जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त प्रतिवर्षी बसव प्रतिष्ठान अखिल भारतीय सामाजिक संघटनेच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा "राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार" देऊन राज्ययील दिग्गज मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येते. सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल,फेटा असे पुरस्कार स्वरूप आहे. जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव २०२५ निमित्त यंदाचा पुरस्कार सोहळाच ०९ वे वर्ष असून आतापर्यंत राज्यातील २४० व्यक्तींना संघटनेचा माध्यमातून सन्मानित करण्यात आला आहे. पुरस्काराने सामाजिक कार्याची प्रेरणा मिळावी, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ऊर्जा मिळावी ही उदात्त हेतू सामोरे ठेऊन बसव प्रतिष्ठानच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुरूम येथे या सोहळ्याचे आयोजन केले जाते, सण २०२५ या वर्षात ३० एप्रिल रोजी म्हणजेच अक्षय तृतीया रोजी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती सोहळा संपन्न होणार आहे, त्यानंतर मे २०२५ महिन्यात "राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार" सोहळा संपन्न होणार असून या सोहळ्यात सामाजिक,राजकीय,...

राष्ट्रवादी ओबीसी विभाग उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष अशोक राजपूत यांचा वाढदिवस साजरा .

Image
प्रतिनिधी-सोलापूर  दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,तसेच सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे,मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असा खरा दोस्त म्हणजे अशोक रजपूत. यांचा काल दि. 28 फेब्रुवारी रोजी त्यांचा मित्रपरिवाराच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.अशोक रजपूत यांची राष्ट्रवादी ओबीसी विभाग उत्तर सोलापूर तालुका अध्यक्षपदी काही दिवसांपूर्वी नुकतीच निवड झालेली आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त ऋषिकेश माळशिकारे प्रभाकर पाटोळे सागर वाघमोडे रोहन उडानशिव बंटी सरवदे दिनेश लोखंडे अंबादास मोरे सिद्धांत सावंत बबलू सकट मनोज साळुंखे,श्रीकांत वाघमोडे, अमन पाटोळे,उमेश रणदिवे आदी मित्रांनी शुभेच्छा दिल्या. -------------------------------------- ▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०