दक्षिण सोलापूरचे लोकनेते,माजी मंत्री कै.आनंदराव देवकते यांच्या जयंतीनिमित्त राजूर येथे अभिवादन.


प्रतिनिधी -सोलापूर 
राज्याचे माजी कैबिनेट मंत्री आनंदराव देवकते यांनी आपल्या कार्यकाळात दक्षिण सोलापूरचा सर्वांगीण विकास केला आहे. 
त्यांनी राजकारणाबरोबरच समाजकारणावरही विशेष भर दिला होता. समाजातील अनेक घटकांना त्यांनी विकासाच्या प्रवाहात आणले होते. नाही रे वर्गातील अनेक युवकांना राजकारणात आणून त्यांना मोठी पदे मिळवून दिली होती. जनतेच्या प्रश्नासाठी ते नेहमीच लढत राहिले. असे प्रतिपादन माजी आमदार दिलीप माने यांनी केले.राजूर या देवकते यांच्या जन्म गावी त्यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माने बोलत होते. 
यावेळी व्यासपीठावर माजी सभापती भीमाशंकर जमादार, अशोक देवकते, कस्तुराबाई शेळके,जगदेवी देवकते, सुभाष देवकते, सतीश देवकते, राहुल देवकते, अरुण देवकते, आप्पासाहेब काळे, गंगाधर बिराजदार, प्रथमेश पाटील, राधाकृष्ण पाटील, विजयकुमार मुलगे, पंडित बुळगुंडे, आमसिध्द बुळगुंडे, भारत बनसोडे, शिवपुत्र खांडेकर, हनुमंतराव बिराजदार, कृष्णप्पा बिराजदार, रामचंद्र बिराजदार, शिवानंद यलगोंडे, लक्ष्मण कोळी, मल्लिकार्जुन बुळगुंडे, दादा ठाकरे आदी उपस्थित होते.माने पुढे म्हणाले, देवकते यांनी उजनीचे आठमाही पाणीवाटप धोरण त्यांच्यामुळेच अमलात आले. त्यामुळे हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली आले. त्यांच्या राजकीय विचारधारेनुसार आम्ही कार्यरत राहू, अशी ग्वाही माजी आमदार माने यांनी दिली.
यावेळी माजी सभापती जमादार म्हणाले, आनंदराव देवकते यांनी तालुक्याच्या विकासासाठी शेवटपर्यंत झटत राहिले. त्याने माझ्यासह अनेक नाही रे वर्गातील लोकांना राजकारणात आणून त्यांना प्रतिष्ठा आणि पद मिळवून दिले आहे.काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी सर्वजण मिळून काम करणे गरजेचे आहे तरच त्यांना खरी आदरांजली ठरेल. यावेळी आनंदराव देवकते प्रतिष्ठानकडून आदर्श शिक्षिका म्हणून विजयालक्ष्मी पाटील, आदर्श आशा सेविका म्हणून सुवर्णा ठावरे तर आदर्श बचते गटाच्या अध्यक्षा म्हणून शोभा देवकते यांना पुरस्कार देण्यात आले. प्रास्ताविक तुकाराम मळेवाडी यांनी तर सूत्रसंचालन मल्लिकार्जुन बिराजदार यांनी केले.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर