दैनिक लोकशाही मतदार वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान.







सोलापूर (प्रतिनिधी)
जगभरात महिला आजच्या घडीला कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीत याचे प्रत्यय नेहमीच आपल्याला येत असते सामाजिक शैक्षणिक प्रशासन पासून ते राजकीय तसेच सत्ता चालविण्या पर्यंत महिला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना पाहायला मिळते देशभरात ८ मार्च हा दिवस जागतिक महिलादिन म्हणून साजरा करण्यात येतो विविध ठिकाणी विविध उपक्रमांनी महिलादिन साजरा केला जातो संघर्षवादी महिलांचा सन्मान केला जातो महिला या कुटुंबाची मोठी व महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असताना कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष निर्भिडपणे काम करत आहेत त्याच अनुषंगाने सोलापुरात सामाजिक राजकीय शैक्षणिक तथा विविध क्षेत्रात काम करत आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी जेणेकरून त्यांना काम करण्यासाठी नव्याने आणखी ऊर्जा मिळेल यासाठी दैनिक लोकशाही मतदार वतीने "नारी शक्तीचा" सन्मान या कार्यक्रमाचे दैनिक लोकशाही मतदार चे मुख्य संपादक अक्षय बबलाद यांच्या उपस्थितीत समाज कल्याण हॉल येथे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीमाई माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध कुष्टरोग तज्ञ तथा आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते यु. एफ. जानराव हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे सोलापूर शहर अध्यक्ष अन्सार तांबोळी (बी.एस) दैनिक लोकशाही मतदार चे प्रमुख सल्लागार ॲड.दिलीप जगताप सल्लागार ॲड.सागर हंबीरराव हे होते.याप्रसंगी समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या १० महिलांचा प्रशस्तीपत्र देऊन शाल व प्रबुद्ध प्रकाशन प्रस्तुत पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगतपर मार्गदर्शन केले.सदरील कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दैनिक लोकशाही मतदार चे प्रतिनिधी अनसार शेख बाबा कांबळे छायाचित्रकार रोहित घोडके सिद्धाराम मदरी आदींनी अथक परिश्रम घेतले.तर कार्यक्रमास उपस्थितांचे आभार अशोक ढोणे यांनी मानत महिलांच्या सुरक्षितता सध्याच्या घडीला किती महत्त्वाचे आहे याचे विश्लेषण केले तथा उपस्थित सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास मानवाधिकार संरक्षण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख, महेबुब कादरी, लक्ष्मण सुरवसे, राजू वग्गु, अंबादास गज्जम, राम हुंडारे, वैजिनाथ बिराजदार, योगिनाथ स्वामी, सिधलींग नवले, नितीन साठे, हर्षदा बबलाद, विदिशा चव्हाण सह दैनिक लोकशाही मतदार समूह , मित्रपरिवार पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांचा करण्यात आला सन्मान.
विशाखा उबाळे - भीम आर्मी अध्यक्ष
मनीषा कांबळे - गुप्तचर विभाग सोलापूर (SID)
रक्षंदा स्वामी - पत्रकार
साधना गायकवाड - सामाजिक कार्यकर्त्या तथा आंबेडकरी चळवळीतील नेत्या
नुसरत शेख - सामाजिक कार्यकर्त्या 
लैला अष्टुळ - सामाजिक कार्यकर्त्या
वर्षा बनसोडे - सामाजिक कार्यकर्त्या 
नाझिया काझी - पोलिस कर्मचारी (महिला तक्रार निवारण)
दैनिक लोकशाही मतदार चा स्तुत्य उपक्रम - अनसार तांबोळी(बी.एस)
दैनिक लोकशाही मतदार वतीने जो जागतिक महिला दिनानिमित्त "नारी शक्तीचा" सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हे एक स्तुत्य उपक्रम असून समाजात एक स्त्री आपल्या जीवनाशी झगडत असताना संघर्ष करत असताना समाजाचे ऋण फेडण्यासाठी विविध क्षेत्रात काम करत असते त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अश्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले पाहिजे असे म्हणत उपस्थित तथा सन्मानाचे मानकरी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते ही गर्वाची बाब - रामचंद्र सरवदे
आजच्या युगात महिला या कोणत्याच क्षेत्रात काम करताना मागे नाही पोलिस प्रशासन असो राजकीय सारीपाट सांभाळण्याचे का असो तथा देशाचे राष्ट्रपती पद संभाळण्यापर्यंत महिलांनी आज मजल मारली आहे आज महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने काम करत आहेत ही एक देशासाठी समाजासाठी गर्वाची बाब आहे असे अधोरेखित करत उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महिलांनी कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष आणि निर्भिडपणे काम केले पाहिजे - यशवंत पवार
महिलादिनाच्या निमित्ताने दैनिक लोकशाही मतदाराच्या आयोजित कार्यक्रमात सर्व सन्मानित महिलांना जागतिक महिलादिनाच्या तथा पुढील कार्यकिर्दिस शुभेच्छा देऊन महिलांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत खडतर जीवनातून तथा संघर्षमय जीवनातून आज काहीही करण्याचे व करून दाखवण्याचे जिद्द ठेवणारी म्हणजे महिला आहे. आज महिला जे काही मनात आणेल ते तडीस नेल्याशिवाय राहत नाही सगळ्याच क्षेत्रात आज महिलांचे उत्तुंग भरारी आहे असे मनोगतपर बोलताना यशवंत पवार म्हणाले.
महिलांनी आपल्या राष्ट्रमातांच्या त्यागांना विसरू नये-यु.एफ.जानराव.
महिलांनी आपल्या राष्ट्रमाता सावित्रीमाई माता रमाई माता जिजाऊ माता अहिल्याबाई होळकर यांच्या अपार कष्ट त्याग आणि संघर्षमय जीवन ज्याप्रकारे समाजाचा सर्व महिला जनांचा उद्धार करण्यासाठी घालविला ज्या राष्ट्रमातांमुळे आज आपण या हुद्यावर काम करू शकतो स्वतंत्रपणे ताठ मानेने जगू शकतो त्यांचे कष्ट त्यागांना तसेच संविधानाच्या विचारांना विसरू नये महिला आज कुठेही काम करताना निर्भिडपणे काम करत असतात आपल्या अश्या माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत जानराव यांनी मनोगत व्यक्त केले.
 महापुरुषांच्या विचारांवर चालल्यास महिलांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत - नुसरत शेख
आज पुरुषप्रधान देश असताना या देशात अनेक महान महापुरुष भारत देशात होऊन गेले या देशातील महापुरुषांच्या विचारावर चालल्यास महिलांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत अशी भावना नुसरत शेख यांनी दैनिक लोकशाही मतदार आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केल्या याप्रसंगी महिलांनी नेहमीच सतर्कतेने काम केले पाहिजे आपल्या आदर्शांच्या विचारावर काम केले पाहिजे असे प्रतिपादन करत उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
 
महिलांनी जागरूक राहून काम करणे गरजेचे - साधना गायकवाड 
सध्या महिला कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीत सर्व क्षेत्रात काम करतात आणि मोठी मजल महिलांनी प्रत्येक ठिकाणी मारली आहे परंतु सध्याच्या घडीला वाढत चाललेला महिलांवरील अन्याय अत्याचार पाहता महिलांनी जागरूक राहून काम केले पाहिजे जिथे अन्याय होईल तिथे पेटून उठले पाहिजे अशी आक्रमक भूमिका मांडत साधना गायकवाड यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महिलांनी नेहमी सकारात्मक दिशेने पाऊल टाकावे - लैला अष्टुळ
महिला या समाजात काम करत असताना कोणतेही क्षेत्र निवडताना नेहमी सकारात्मक दिशेने पाऊल टाकले पाहिजे कोणतीही गोष्ट करताना धाडसी वृत्ती ठेवली पाहिजे असे म्हणत उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर