श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर विभागात उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार.

प्रतिनीधी-
मुरुम
महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आयोजित करिअर कट्टा अंतर्गत वर्षभरात केलेल्या सक्रिय उपक्रमाबद्दल धाराशिव जिल्ह्यातील प्रथम तसेच छत्रपती संभाजीनगर विभागात चार जिल्ह्यातून  उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालय म्हणुन विशेष प्रमाणपत्र आणि स्मृती चिन्ह देऊन देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, करिअर कट्टा  प्रमुख यशवंत शितोळे, प्राचार्य प्रवर्तक डॉ संजय खरात, पुणे,  विभागीय समन्वयक  प्राचार्य डॉ भारत खंदारे, प्राचार्य हरिदास विधाते यांच्या हस्ते प्राचार्य डॉ संजय अस्वले यांना सन्मानित केले.
छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी  महाविद्यालयातील रविन्द्रनाथ टागोर सभागृहात करिअर कट्टा विभागीय स्तरावरील बक्षीस वितरण सोहळा आणि NEP एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी विभागीय समन्वयक डॉक्टर राजेश लहाने सह समन्वयक डॉक्टर कुरपुटवार जिल्हा समन्वयक पेरके मॅडम यांची उपस्थिती होती
करिअर कट्टा अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास सेंटर ऑफ  एक्सेलन्स A+ दर्जा मिळाला असून या अंतर्गत स्पर्धा परीक्षा केंद्र, इनकुबेशन सेंटर पोलिस अकॅडमी,  IAS आपल्या भेटीला, उद्योजक आपल्या भेटीला, विद्यार्थी संसद, विविध  कौशल्य विकास कोर्सेस आदी विद्यार्थी केंद्रित उपक्रम महाविद्यालयात राबविण्यात येत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या डॉ अर्जुन कटके यांना सन्मानित करण्यात आले. तसेच विद्यार्थी संसदेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या डॉक्युमेंटरीला जिल्ह्यातून प्रथम पारितोषिक मिळाले. याबद्दल सैफ इनामदार, प्रसाद मम्माळे, आणि प्रज्वल चालुक्य यांचाही  स्मृतीचिन्ह देऊन  सन्मान करण्यात आला.
करिअर कट्टा च्या या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजीराव मोरे, उपाध्यक्ष अश्लेष शिवाजीराव मोरे, सरचिटणीस जनार्धन साठे, सचिव पद्माकर राव हराळकर, सहसचिव डॉ. सुभाष वाघमोडे उप प्राचार्य डॉ. विलास इंगळे, उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिठले, उपप्राचार्य जी. एस मोरे पर्यवेक्षक शैलेश महामुनी प्रबंधक राजकुमार सोनवणे कार्यालयीन अधीक्षक नितीन कोराळे आदींनी अभिनंदन केले आहे.
---------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर