छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमध्ये मधमाशी पालन प्रशिक्षण.


प्रतिनिधी -सोलापूर 
युगंधर फाउंडेशन सोलापूर आणि छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज यांच्या वतीने मधमाशी पालन प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक 10 मार्च ते 14 मार्च दरम्यान करण्यात आले आहे. युगंधर फाउंडेशन सोलापूर आणि सीबीआरटीआय पुणे यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रात इतर ठिकाणी मधमाशी पालन प्रशिक्षण वेळोवेळी आयोजित करण्यात येते .



शेतीसाठी उत्तम जोडधंदा आणि ग्रामीण भागातील युवकांसाठी उत्तम व्यवसाय संधी म्हणून मधमाशी पालन करणे हे आवश्यक आहे असे मत या कार्यशाळेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मधुकर पवार यांनी व्यक्त केले. मधमाशी ही जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक आहे तसेच अन्नसाखळीतील परागीभवन या महत्त्वाच्या क्रियेमध्ये मधमाशीचा सर्वात महत्त्वाचा रोल आहे. 

त्यामुळे मधमाशीचे पालन करून आपण त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करू शकतो असे मत युगंधर फाउंडेशनच्या अध्यक्षा प्राध्यापिका रेश्मा माने यांनी मांडले. पाच दिवसीय प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना मधमाशी पालनासाठी आवश्यक असणारे मधमाशीचे जीवन चक्र मधमाशी पालनासाठी लागणारे साहित्य मधमाशी पालनातून तयार होणारे उत्पादने आणि मधमाशी पालनातून भविष्यामध्ये उद्योगाच्या संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मधमाशी पालन करणे हे शेतीसाठी अतिशय उपयुक्त आहे आपल्या शेतातील उत्पादन वाढवण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाकडे वळावे यासाठी आणि मिशन च्या माध्यमातून केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहे. ग्रामीण भागातील युवकांना अशा प्रकारच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून वळवण्यासाठी युगंधर फाउंडेशन वेळोवेळी प्रयत्न करीत असते. महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी मधमाशी पालन प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदविला आहे. या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी तज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. सिद्धार्थ तळभंडारे तसेच डॉ. किशोर शिंदे एनएसएस विभाग प्रमुख डॉ युवराज सुरवसे, राहुल लोंढे, अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर पवार हे होते यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अरुण सोनकांबळे डॉ .राणी मोटे डॉ. वाल्मीक कीर्तिकर प्रा. कोचेकर प्रा. भुसे प्रा. श्रीकांत होटकर व महाविद्यालयातील दत्ता भोसले, शहाजी जाधव राजाभाऊ घंदुरे, महेश डेंगळे,संतोष अलकुंटे  संजू थिटे, केशव लोंढे तसेच या मधमाशी पालन प्रशिक्षणातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
--------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर