Posts

Showing posts from March, 2024

सोमपा वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लोलु यांच्या साखळी उपोषणास विविध क्षेत्रातील मान्यवरांचा जाहीर पाठींबा.

Image
सोमपा वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लोलु यांच्या साखळी उपोषणास विविध क्षेत्रातील मान्यवरांचा जाहीर पाठींबा. प्रतिनिधी-सोलापूर सोलापूर महानगरपालिका माजी सभागृह नेते तथा नगरसेवक   देवेंद्र भंडारे,नरसिंग कोळी, जेम्स जंगम,व सोमपा आरोग्य निरीक्षक संघटना अध्यक्ष शेषराव शिरसट यांनी सोमपा वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लोलु यांच्या न्याय, हक्क व अधिकार मागणीस पुनम गेट आंदोलन स्थळी भेट व पाठिंबा जाहीर दिला आहे. जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ लष्कर सोलापूर चे अध्यक्ष करेपा अण्णा जंगम यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या समाज संचलित जांबमुनी प्रशालेचे माजी सेक्रेटरी व जांबमुनी प्राथमिक शाळेचे माजी चेअरमन तथा सोमपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलु वाय. एच.यांच्यावर कोरोना काळात नियुक्ती नसलेले नियमबाह्य व चुकीचे कारणामुळे ,कार्यक्षेत्राबाहेरील , वालचंद काँलेज काँरटाईन सेंटरच्या कामाशी संबंध येत नसतानाही त्यातील डॉ. व कर्मचारी यांना जबाबदार न धरता ,मनपा प्रशासन ने षडयंत्र करून तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लोलु यांची चौकशी न करता व समिती गटीत करून अहवाल न घेता,शहानिशा न करता व आरोग्य अधिकार...

मीपणाचा अहंकार नष्ट करून मन स्वामीभक्तीत रमवावं - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.

Image
मीपणाचा अहंकार नष्ट करून मन स्वामीभक्तीत रमवावं - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व कुटूंबियांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत. प्रतिनिधी - अक्कलकोट गुरूंचे नामस्मरण, देवाचे दर्शन हे पुण्यकर्म आहे. मन एकाग्र करून स्वामीनाम घेत राहिल्याने आत्मिक सुखाची प्राप्ती होते.  श्री स्वामी समर्थ हे गुरूंचे गुरु असून  गुरु हे नेहमीच मार्गदर्शक असतात. त्यांचे नामस्मरण केल्याने जीवन मुक्ती प्राप्त होते. म्हणून जीवनात गुरूंचे स्मरण विशेष महत्त्वाचे आहे. या माध्यमातून गुरुकृपेची प्रचिती येते. यामुळे माणसा-माणसांच्या मनामध्ये प्रेम, दयाभाव निर्माण होऊन सद्गुरुकृपेची स्वामी कृपेची प्राप्ती होते. यामुळे शिष्य साधकाचे भक्तांचे जीवन सुवर्णमय होऊन जाते. कारण ब्रम्हांडनायक सद्गुरु स्वामींना समजल्याने जीवनात मीपणाचा अहंकार नष्ट होतो. हा अहंकार नष्ट झाल्याने मानवाचे मन परमार्थाकडे, भक्तीकडे वळते. त्यामुळं मीपणाचा अहंकार नष्ट करून मन स्वामीभक्तीत रमवावं असे मनोगत सोलापूर जिल्हा परिषदेचे गतकालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व संभाजी नगरचे विद्यमान जिल्हाधिकारी...

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगरची शैक्षणिक सहल संपन्न.

Image
प्रतिनिधी - अक्कलकोट दि.१५ व १६ मार्च २०२४ रोजी शाळेचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय पोतदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षित केलेल्या  महाराष्ट्राच्या दोन एस. टी. बसेसने शाळेची सहल कोल्हापूर दर्शन त्यामध्ये नृसिंह वाडी, शाहू पॅलेस, रंकाळा तलाव, महालक्ष्मी मंदिर, सिध्दगिरी म्युझियम,7D थिएटर,तारांगण, माया महल,सिद्धगिरी डिवाइन गार्डन, कन्हेरी मठ, सज्जकोटी, तीन दरवाजा, पन्हाळ गड, जोतिबा मंदिर या ठिकाणी जाऊन संपन्न झाली.एस. टी. बसेस मध्ये विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी  साऊंड सिस्टीमची सोय करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने विविध गाण्यांवरती नृत्य करत सहलीचा मनसोक्त आनंद घेतला.शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना नाष्टा देण्यात आला.सहलीच्या पहिल्या दिवसाचा मुक्काम सिद्धगिरी  संस्थान मठ येथे करण्यात आला. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी वेगवेगळ्या रूमची सोय करण्यात आली. विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना झोपण्यासाठी गादीची सोय, आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय करण्यात आली होती. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोतदार सर यांच्या विशेष प्रयत्नातून माजी मंत्री सतेज पाटील यांच्या ...

सोलापुरात एम के फाऊंडेशन च्या माध्यमातून पाणपोई केंद्रे सुरु.

Image
एम के फाउंडेशन च्या माध्यमातून सोलापुरात हत्तुरे वस्ती व सैफूल येथे पाणपोई केंद्र सुरु करताना उपस्थित मान्यवर. प्रतिनिधी-सोलापूर दरवर्षी उन्हाळ्यात सामजिक कार्याचे भान ठेऊन एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी स्वखर्चाने पाणपोई सुरू करत असतात.यंदा ही सोलापूर जिल्ह्य़ात तापमानात वाढ होत असताना व सर्व सामान्य माणसांची गरज ओळखून एम के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंट चे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी तहानलेल्या सोलापूरकरासाठी घोटभर थंड पाणी पिऊन क्षणभर विश्रांती घेण्यासाठी सोलापुरात जागोजागी आज पाणपोई केंद्र सुरु करण्यास सुरुवात केली. आज सोलापुर येथील सैफूल व हत्तुरे वस्ती भागात नागरिकांना थंड पाणी मिळावे म्हणून एक के फाउंडेशन च्या वतीने पाणपोई केंद्र सुरु करण्यात आले आहे. नेहमीच सामजिक कार्यात अग्रेसर असणारी एम के फाउंडेशन यंदा तीव्र उन्हाळ्यात सामाजिक सेवेचा भाव जपत वाटसरूंना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिल्याने एम के फाउंडेशन चे सर्वत्र कौतुक होताना पहायला मिळत आहे.कारण सर्व सामान्य नागरिकांची तहान भागविण्याचे पुण्य आज महादेव कोगनुरे यांच्याकडून होताना...

वटवृक्ष मंदिरातील सेवाश्रमातून बाळासाहेबांच्या कर्तृत्वास अमरत्व प्राप्त झाले - डॉ.शैलेंद्र देवळाणकर

Image
  कै.कल्याणराव इंगळे यांच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त कै.कल्याणराव इंगळे यांच्या अर्धपुतळ्यास अभिवादन व विविध कार्यक्रमाचे शुभारंभ करताना डॉ.शैलेंद्र देवळाणकर व अन्य मान्यवर दिसत आहेत. प्रतिनिधी - अक्कलकोट 'नश्वर मानवी जीवन दुसऱ्यांसाठी कष्टत संपवण्यातच जीवनाचे खरे सार्थक आहे' या वाक्याचा अर्थ कै.बाळासाहेबांच्या कार्याकडे पाहिल्यास उमजतो. हा आदर्श स्वतः कै.बाळासाहेबांनी देखील बाळगून  श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या माध्यमातून आयुष्यभर जनकल्याणाची कामे केली आहेत. ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांना सोयीसुविधा पुरविण्याबरोबरच रुग्णसेवेसाठी रुग्णालय, जवळपास १६ वर्षांपूर्वी तालुक्यातील विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणासाठी तंत्रनिकेतन महाविद्यालयाची निर्मीती केली.  संपुर्ण जीवन स्वामी सेवेबरोबरच वटवृक्ष मंदीरातील भाविकांच्या सेवेकरीता समर्पित केले. हे कार्य स्वामी सेवक कै.बाळासाहेब इंगळे यांनी वटवृक्ष मंदिर समितीवर कार्यरत असताना स्वामी सेवेचे धेय बाळगून केले आहे. तह्यात जीवनात त्यांनी पहाटे ४ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत अनेक भाविकांच्या सेवेकरीता, मंदीर समितीत कार्यालय...

आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्रचे संयोजक व राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ.अजित गोपछडे यांचा सत्कार.

Image
प्रतिनिधी - सोलापूर दि.१३ मार्च २०२४ रोजी आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र चे संयोजक व राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ.अजित गोपछडे सर यांनी सपत्नीक सदिच्छा भेट दिली.  यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजेश फडकुले सर यांच्या वतीने मा.खा.डॉ. गोपछडे सर यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना संस्थाध्यक्ष डॉ. राजेश फडकुले सर म्हणाले की,मा.खा.डॉ. गोपछडे सर हे भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्राचे संयोजक आहेत. त्यांच्या लोकसंग्रह प्रचंड आहे. त्यांचे कार्य अतिशय वाखाणण्यासारखे आहे. आता ते राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार झाले आहेत. त्यांच्या या खासदारकीच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या हातून चांगली समाजसेवा घडो. त्यांना त्यांच्या राजकीय, सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो, ही प. पू.१०८ आचार्य आर्यनंदी महाराज चरणी प्रार्थना. याप्रसंगी बोलताना मा. खा.डॉ. गोपछडे सर म्हणाले की, डॉ. राजेश फडकुले सर हे एक अतिशय अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्यांचा माझा जुना परिचय आहे. त्यांच्यामुळेच माझा या प...

सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी निरीक्षकपदी सुदीप चाकोते समन्वयक पदी चेतन नरोटे यांची नियुक्ती व्हावी. सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्त्यानी दिले प्रांत अध्यक्षांना निवेदन.

Image
प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना निवेदन देताना राशिद शेख महमद शेख गौतम कांबळे आदी. प्रतिनिधी - सोलापूर लवकरच देशभरामध्ये लोकसभेचा बिगुल वाजणार आहे.  सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून यावेळी काँग्रेस पक्षाच्या झुंजार नेत्या आमदार प्रणिती ताई शिंदे निवडणूक मैदानात उतरल्याचे पाहावयास मिळाल्याने भारतीय जनता पक्षाकडून कोणता उमेदवार द्यावा यासंदर्भात अस्वस्थता जाणवत आहे. गेल्या दोन वेळा सोलापूरच्या जनतेने लोकसभेला भाजपा उमेदवार निवडून दिला खरा परंतु दोन्ही खासदार विकास कामे न करता दहा वर्षे अत्यंत निष्क्रिय राहून सोलापूर जिल्ह्यातील जनतेची फसवणूक  केली असल्याची भावना आहे. शिवाय शेतकरी  कष्टकरी अल्पसंख्यांक मागासवर्गीय समाज बांधवांमध्ये असणारा प्रचंड रोष बेरोजगारी महागाई हाच कळीचा मुद्दा असून सतत जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या आमदार प्रणिती ताई शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यास त्यांचा विजय निश्चित आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणारे सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्ष संघटना मजबूत करून बूथ यंत्रणा मजबूत करून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व युवा कार्यक...