जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगरची शैक्षणिक सहल संपन्न.



प्रतिनिधी-अक्कलकोट
दि.१५ व १६ मार्च २०२४ रोजी शाळेचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय पोतदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षित केलेल्या  महाराष्ट्राच्या दोन एस. टी. बसेसने शाळेची सहल कोल्हापूर दर्शन त्यामध्ये नृसिंह वाडी, शाहू पॅलेस, रंकाळा तलाव, महालक्ष्मी मंदिर, सिध्दगिरी म्युझियम,7D थिएटर,तारांगण, माया महल,सिद्धगिरी डिवाइन गार्डन, कन्हेरी मठ, सज्जकोटी, तीन दरवाजा, पन्हाळ गड, जोतिबा मंदिर या ठिकाणी जाऊन संपन्न झाली.एस. टी. बसेस मध्ये विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी  साऊंड सिस्टीमची सोय करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने विविध गाण्यांवरती नृत्य करत सहलीचा मनसोक्त आनंद घेतला.शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना नाष्टा देण्यात आला.सहलीच्या पहिल्या दिवसाचा मुक्काम सिद्धगिरी  संस्थान मठ येथे करण्यात आला. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी वेगवेगळ्या रूमची सोय करण्यात आली. विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना झोपण्यासाठी गादीची सोय, आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय करण्यात आली होती.
शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोतदार सर यांच्या विशेष प्रयत्नातून माजी मंत्री सतेज पाटील यांच्या कडून रंकाळा तलावा जवळील बागेत सर्व विद्यार्थी व शिक्षकांना जेवण्याची सोय करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष श्री. श्रीधर गोंधळी साहेब यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्याना जेवणाची सोय करण्यात आली. शाळेच्या वतीने माजी मंत्री सतेज पाटील पाटील,आमदार आसगावकर साहेब यांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांनी अगदी मनसोक्तपणे सहलीचा आनंद लुटला. सहल यशस्वी रित्या पार पडल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय पोतदार सर यांनी व सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले. सहल यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच शाळेतील शिक्षक श्री. यल्लाप्पा पुटगे, श्री. हणमंतराव गुंडरगी, मल्लिनाथ चनपटणे, हाजराबी बागवान, संध्या बशेट्टी, दिनकर भारती आणि सर्व विद्यार्थ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
----------------------------------------
◾️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
◾️सिध्दार्थ भडकुंबे(पत्रकार)
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर