आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्रचे संयोजक व राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ.अजित गोपछडे यांचा सत्कार.
प्रतिनिधी-सोलापूर
दि.१३ मार्च २०२४ रोजी आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र चे संयोजक व राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ.अजित गोपछडे सर यांनी सपत्नीक सदिच्छा भेट दिली.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजेश फडकुले सर यांच्या वतीने मा.खा.डॉ. गोपछडे सर यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना संस्थाध्यक्ष डॉ. राजेश फडकुले सर म्हणाले की,मा.खा.डॉ. गोपछडे सर हे भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्राचे संयोजक आहेत. त्यांच्या लोकसंग्रह प्रचंड आहे. त्यांचे कार्य अतिशय वाखाणण्यासारखे आहे. आता ते राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार झाले आहेत. त्यांच्या या खासदारकीच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या हातून चांगली समाजसेवा घडो. त्यांना त्यांच्या राजकीय, सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो, ही प. पू.१०८ आचार्य आर्यनंदी महाराज चरणी प्रार्थना. याप्रसंगी बोलताना मा. खा.डॉ. गोपछडे सर म्हणाले की, डॉ. राजेश फडकुले सर हे एक अतिशय अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्यांचा माझा जुना परिचय आहे. त्यांच्यामुळेच माझा या पतसंस्थेशी स्नेहबंध निर्माण झाला आहे. मागील वर्षी मी आपल्या पतसंस्थेला भेट दिली होती.आपल्या पतसंस्थेचे कार्य अतिशय उत्तम आहे, त्यामुळेच आपल्या पतसंस्थेची भरभराटी होत आहे. आपल्या सर्वांचे प्रेम व महाराजांचे शुभाशीर्वाद यामुळेच नव्याने खासदार झालो आहे. आपलं प्रेम असेच राहो.
या प्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव आहेरकर, कर्मचारी प्रतिनिधी प्रवीण बुर्से, व्यवस्थापिका लक्ष्मी आरगी, वरिष्ठ श्रेणी अधिकारी श्री सतीश शिंदे,निधी कंपनीच्या सहव्यवस्थापिका राधिका बिल्लमपल्ली,लावण्या दोरनाल, वरिष्ट लिपीक बसवराज परचंडे, कर्ज वसूली अधिकारी दिपक रंगदळ,लिपीक राहुल तवटी,अश्विनी माहुलीकर, डिजिटल मार्केटिंग प्रमुख किरण येरगुंटला,राजेश्वर पाटील, प्रकाश माशाळकर,ओंकार पलसे, सेविका कविता माने आदि उपस्थित होते.
----------------------------------------
◾️सिध्दार्थ भडकुंबे(पत्रकार)
◾️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर
👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240