सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी निरीक्षकपदी सुदीप चाकोते समन्वयक पदी चेतन नरोटे यांची नियुक्ती व्हावी. सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्त्यानी दिले प्रांत अध्यक्षांना निवेदन.

प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना निवेदन देताना राशिद शेख महमद शेख गौतम कांबळे आदी.


प्रतिनिधी-सोलापूर

लवकरच देशभरामध्ये लोकसभेचा बिगुल वाजणार आहे.  सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून यावेळी काँग्रेस पक्षाच्या झुंजार नेत्या आमदार प्रणिती ताई शिंदे निवडणूक मैदानात उतरल्याचे पाहावयास मिळाल्याने भारतीय जनता पक्षाकडून कोणता उमेदवार द्यावा यासंदर्भात अस्वस्थता जाणवत आहे. गेल्या दोन वेळा सोलापूरच्या जनतेने लोकसभेला भाजपा उमेदवार निवडून दिला खरा परंतु दोन्ही खासदार विकास कामे न करता दहा वर्षे अत्यंत निष्क्रिय राहून सोलापूर जिल्ह्यातील जनतेची फसवणूक  केली असल्याची भावना आहे. शिवाय शेतकरी  कष्टकरी अल्पसंख्यांक मागासवर्गीय समाज बांधवांमध्ये असणारा प्रचंड रोष बेरोजगारी महागाई हाच कळीचा मुद्दा असून सतत जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या आमदार प्रणिती ताई शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्यास त्यांचा विजय निश्चित आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणारे सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्ष संघटना मजबूत करून बूथ यंत्रणा मजबूत करून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणारा लोकसभेसाठी पक्ष निरीक्षक म्हणून सोलापूरचे सुपुत्र सध्या देशातील कर्नाटक तेलंगणा सह अनेक राज्यामध्ये निरीक्षक म्हणून जबरदस्त काम करणारे युवा नेते सुदीप दादा चाकोते व समन्वयक म्हणून माजी गट नेते नगरसेवक चेतन भाऊ नरोटे यांची नियुक्ती झाल्यास लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा झंजावात पाहायला मिळेल असे निवेदन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राशिद शेख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा सरचिटणीस भीमराव बाळगे संघटक रमेश हसापुरे मल्लेशी बिडवे सचिव महमद शेख अल्पसंख्यांक विभाग  जिल्हा उपाध्यक्ष कयूम बलोलखान बहुजन फाऊंडेशनचे प्रमुख गौतम कांबळे दक्षिण तालुका सचिव समीर पठाण उपाध्यक्ष रेवणसिद्ध नांगरे अली शहापूर यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

-----------------------------------------



Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर