Posts

श्री वटवृक्ष मंदिरामुळे स्वामी समर्थांची कीर्ती सर्वदूर - न्यायाधीश ईश्वर सुर्यवंशी.

Image
न्यायाधीश ईश्वर सुर्यवंशी यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत. प्रतिनिधी-अक्कलकोट  श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मुळे व स्वामी समर्थांच्या जागृत वास्तव्यामुळे अनेक भाविकांना स्वामींच्या कार्याची प्रचिती येत आहे. या प्रचितीमुळेच भाविकांचा कल स्वामी दर्शनाकडे नित्य वाढतच आहे. येथील वटवृक्ष मंदिरातील उत्कृष्ट व्यवस्थापन, नियोजनबद्ध दर्शनसेवा, विनम्रभावे आदरितिथ्य या सर्व आध्यात्मिक पैलुंमुळे अक्कलकोट तीर्थक्षेत्र हे आज मितीस सर्वोच्च स्थानावर आहे. या निमित्ताने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमुळे स्वामी समर्थांची कीर्ती सर्व दूर पसरली असल्याचे मनोगत सोलापूरचे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ईश्वर सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी न्यायाधीश ईश्वर सुर्यवंशी  यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी न्यायाधीश ईश्वर सुर्यवंशी बोलत होते. याप्रसंगी श्रीशैल गवं...

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनात सातत्य-माजी आयुक्त राजेंद्र भोसले यांचे मनोगत.

Image
मा.आयुक्त पुणे महापालिका राजेंद्र भोसले यांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, तहसीलदार विनायक मगर व अन्य मान्यवर. प्रतिनिधी-अक्कलकोट येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पुणे महानगरपालिकेचे सेवानिवृत्त आयुक्त तथा भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी (IAS) आणि सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे सहकुटुंब देवस्थानास भेट देण्यासाठी आले होते. दर्शनानंतर व्यक्त केलेल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “अनेक वर्षांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन लाभले. हे दर्शन माझ्या व कुटुंबासाठी संस्मरणीय ठरले आहे. श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र मिळणे ही आमच्यासाठी विशेष बाब आहे. एकंदरीत देवस्थान समितीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनात पुर्वीसारखेच सातत्य असून मंदिरातील शिस्त, स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण स्तुत्य आहे.” याप्रसंगी देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांनी माजी आयुक्त राजेंद्र भोसले यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. कार्यक्रमाला तहसीलदार विनायक मगर, तलाठी सुहास डोईफोडे, देवस्थान सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शि...

अतिवृष्टी व पुरामुळे मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन.

Image
प्रतिनिधी-सोलापूर मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिके अतिवृष्टी व भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने मंगळवेढा तहसीलदार सचिन लंगोटे यांना निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनात शिंदे यांनी नमूद केले की, कापूस, सोयाबीन, तुर यांसह अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतामध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे त्वरित पंचनामे करून शासनाकडून शेतकऱ्यांना सुसह्य व शाश्वत मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रसंगी जि. प. सदस्य अर्जुन पाटील, दामाजी कारखाना संचालक राजेंद्र चरणु पाटील, प्रदेश काँग्रेस सेक्रेटरी रविकिरण कोळेकर, सिद्धू कोकरे, जिल्हा काँग्रेस समन्वयक मनोज यलगुलवार, समाधान हाके, पद्मिनी शेट्टीयार, पंडित पाटील, सत्तार इनामदार, सचिन पाटील, संजय पाटील हवालदार, रणजीत पाटील, रवी पुजारी, सागर रणे, राजू हवालदार, प्रकाश चौगुले, अशोक मोरे, बिरुदेव कोकरे, काका पुजारी, मल्हारी पाराधे, उत्तम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. य...

सोलापूरात पर्यटन महोत्सवाची जोरदार तयारी

Image
प्रतिनिधी -सोलापूर  जागतिक पर्यटन दिनानिमित्त सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या वतीने २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत भव्य पर्यटन महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमातून सोलापूर जिल्ह्याचे ब्रॅण्डिंग करून धार्मिक, सांस्कृतिक, कृषी आणि व्यापार क्षेत्राला नवे बळ मिळावे हा उद्देश आहे. या महोत्सवाच्या संकल्पनेला आमदार सुभाषबापू देशमुख यांनी पुढाकार देत शिवधनुष्य पेलले आहे. सोलापूर जिल्हा धार्मिक स्थळांनी समृद्ध असून अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज, पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी व सोलापूर शहरातील सिद्धेश्वर महाराज मंदिर यांसह अनेक ऐतिहासिक मंदिरे येथे आहेत. या मंदिरांचे धार्मिक पर्यटन वाढविण्याबरोबरच कृषी पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन आणि स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे हा महोत्सवाचा प्रमुख हेतू आहे. सोलापुरी डाळिंब, शेंगा चटणी, कडक भाकरी, रेडिमेड गारमेंट्स, प्रसिद्ध सोलापुरी चादर तसेच हुरडा पार्टी या विशेष गोष्टींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोच मिळावी यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. महोत्सवातील प्रमुख आकर्षणे रिल्स, माहितीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व परिसंवा...

संस्कार संजीवनी फाउंडेशनचा उपक्रम;आश्रमातील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप.

Image
प्रतिनिधी-सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर येथे संस्कार संजीवनी फाउंडेशन संचालित वंचित विद्यार्थी आश्रमामध्ये विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे उद्घाटन उळे गावचे उपसरपंच व सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. नेताजी भाऊ खंडागळे यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.या वेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. परमेश्वर काळे सर, सौ. काळे मॅडम, प्रवीण कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमामुळे आश्रमातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळणार असून संस्थेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे