नविन पिढीला शिक्षणासोबत संस्काराची गरज - शरण पाटील.

नविन पिढीला शिक्षणासोबत संस्काराची गरज - शरण पाटील प्रतिनिधी - उमरगा आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी उत्तम शिक्षण व सुसंस्काराची गरज आहे. आई वडीलांसह शिक्षकांच्या हातुनच हे पवित्र कार्य होऊ शकते असे मत उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील यांनी व्यक्त केले. तालुक्यातील डिग्गी येथे मंगळवारी (ता. १४) रोजी महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांचा सत्कार व कृतज्ञता सोहळा आयोजीत करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. महात्मा गांधी विद्यालयाचे सचिव संजय डिग्गीकर अध्यक्षस्थानी होते. पंचायत समितीचे माजी सभापती सचिन पाटील, महात्मा गांधी विद्यालयाचे सचिव संजय डिग्गीकर,संचालक प्रा. युसुफ मुल्ला, विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजीव हेबळे, प्रा. शौकत पटेल, माजी नगरसेवक महेश माशाळकर, माजी सरपंच सिद्धाराम कवठे, योगेश राठोड, विजेता अॅकॅडमीचे संचालक सतीश जाधव, पुणेकर ग्रुपचे अध्यक्ष सचिन हेबळे, उपाध्यक्ष विरेंद्र पाटील, उपसरपंच युवराज कर्पे उपस्थित होते. u पुढे बोलताना श्री. पाटील म्हणाले की, युवकांनी आपल्या कर्तत्वाने व्यवसाय सुरू करून प्रगती क...