Posts

श्री विठ्ठल मंदिरात ज्ञानेश्वर महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न

Image
प्रतिनिधी-अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित देवस्थानच्या ए.वन चौक येथील श्री उपलप विठ्ठल मंदिरात गुरुवार २८ नोव्हेंबर रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पुण्यतिथी मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाली. देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने दुपारी ४ ते ६ या वेळेत भजन संपन्न होऊन नामस्मरण सोहळा संपन्न झाला. त्यानंतर मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती संपन्न झाली. त्यानंतर सर्व भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी सत्संग महिला भजनी मंडळाचे उज्वलाताई सरदेशमुख, कौशल्या जाजू, सुरेखा तेली, निंगूताई हिंडोळे, शकुंतला कटारे, सुरेखा जाधव, प्रदीप हिंडोळे, संजय मोरे, स्वाती जाधव, वंदना शिर्के, शशिकला मडीखांबे, सुवर्णा जाधव, संजय मोरे, काशिनाथ इंडे, रवीराव महिंद्रकर, दीपक बागेवाडीकर, सोनी चव्हाण, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, संजय पवार, विपुल जाधव, साग...

भारतीय संविधान काल आणि आज;लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधान जनजागृतीची गरज.

Image
प्रतिनिधी-सोलापूर मराठा समाज सेवा मंडळ, संचलित छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयात अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त IQAC, इतिहास व एनएसएस विभाग यांच्या संयुक्त विद्यमानेडॉ. वाल्मिक कीर्तीकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी संविधाना बाबत  बोलताना ते म्हणाले संविधानातील मूलतत्त्वांचा आधार घेऊन भारतीय समाजाने वैयक्तिक प्रगती करत, राष्ट्र उन्नती मध्ये योगदान देणे अत्यंत गरजेचे आहे. संविधान दिन साजरा करीत असताना राष्ट्रीय मूल्य जपणूक होणे व संविधानातील विचार सामान्य जनतेपर्यंत विचाररुपी पोहोचले पाहिजेत याकरिता प्रत्येकाने संविधान जनजागृती करण्यासाठी विचार व्यक्त केले.   या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. मधुकर पवार उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपले संविधान हे स्वांतत्र्य, समता, बंधुता व न्याय यावर आधारित आहे. संविधानाने दिलेले हक्क अधिकार याबद्दल जागरूकता तर झालीच पाहिजे व प्रत्येकाने संविधान अंगीकारून संविधानातील मूलतत्त्वांचा आधार घेऊन भारतीय समाजाने वैयक्तिक प्रगती केली पाहिजे असे मत प्राचार्य डॉ पवार यांनी व्यक्त केले....

आण्णा दिक्षित यांना आदर्श शिक्षक पुरस्कार; रयत शिक्षण संकुलामध्ये जल्लोष.

Image
प्रतिनिधी-सोलापूर रावजी सखाराम हायस्कूलचे सहशिक्षक आण्णा बाबु दिक्षित यांना राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्काराने बेळगाव येथे सन्मानित करण्यात आले. हे वृत्त समजतच रयत शिक्षण संकुल जल्लोष करण्यात आला. इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी बेळगाव आणि नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात व गोवा या राज्यातील निवडक शिक्षकांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार सोहळा  बेळगाव येथे संपन्न झाला.   प्रमाणपत्र, विशेष सन्मानचिन्ह, म्हैसूर फेटा, चंदनाचा हार व मा‌. केंद्रीय मंत्री  यांच्याकडून अभिनंदन पत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते . आण्णा दिक्षित उत्तम गणित शिक्षक असून  लेखक, कवी व उत्तम वक्ते आहेत. शिक्षणशास्त्र विषयाच्या अनुषंगाने त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी विविध शाळा व महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले आहे. ते उत्तम मोटिवेशनल स्पीकर आहेत. त्यांना संगणकाचेही उत्तम ज्ञान आहे. माहिती व तंत्रज्ञानाचा चांगला वापर करून विद्यार्थ्...

राजकीय जीवन प्रवासात समर्थांचे व तालुक्यातील जनतेचे आशिर्वाद मोलाचे.

Image
आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व इतर दिसत आहेत. प्रतिनिधी-अक्कलकोट        मी व माझे संपूर्ण कुटूंब स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त आहोत. आपल्या आज पर्यंतच्या राजकीय व सामाजिक कार्यात स्वामी समर्थांचे आशिर्वाद व तालुक्यातील जनतेचे प्रेम व शुभेच्छा आपणांस मोलाचे आहेत. या माध्यमातून आपणास भूतकाळात व वर्तमान काळात लाभलेलं आमदार पद हे तालुक्यातील विकासकामांची साखळी कायम करण्यासाठी मतदारांनी दिलेली अमूल्य संधी आहे.  यामुळे आपण सर्वप्रथम सर्व मतदारांचे आभारी आहोत असे सांगून स्वामी समर्थांचे आशीर्वाद व तालुक्यातील जनतेची आपल्यावरील निष्ठा या मुळेच आपणांस यंदाही विधानसभेच्या निवडणूकीत विजय संपादन होवून सलग दुसऱ्यांदा तालुक्यातील जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून आपणास विधानसभेत पाठविले असल्याचे मनोगत अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे फेरनिर्वाचित आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले. ते नुकतेच संपन्न झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत सलग दुसऱ्यांदा प्राप्त झालेल्या विजयानंतर प्रथम श्री स्...

सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता वसंत सखाराम नाईकनवरे यांचे निधन.

Image
 सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता वसंत सखाराम नाईकनवरे यांचे निधन. प्रतिनिधी-सोलापूर पाटबंधारे खात्यात व सोलापूर जिल्हा परिषदेत विविध अभियन्त्रिकी पदावर सेवा दिलेले व सध्या सर विश्वेश्वरय्या नगर, जुळे सोलापूर येथे वास्तव्यास असलेले, सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता वसंत सखाराम नाईकनवरे (वय ६५ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांचेवर बोंडले, ता. माळशिरस येथील त्यांचे शेतात अंतिम संस्कार करण्यात आले.  यावेळी त्यांचे परिवारांसह नातेवाईक, पदाधिकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, सुन, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे . -------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०