Posts

सोलापूरच्या जिल्हा सरकारी वकील यांचा पुण्यातील पोलीस आयुक्तांच्या हस्ते सन्मान.

Image
प्रतिनिधी - जनता संघर्ष न्यूज,सोलापूर इंडियन ह्यूमन राइट्स कौन्सिल यांच्यावतीने पुण्यातील गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स या ठिकाणी दिनांक २७ /७/२०२४ रोजी सोलापुरातील जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीप सिंग राजपूत यांनी सुमारे शंभर पेक्षा जास्त आरोपींना जन्मठेपेची शिक्षा तर दोन आरोपींना फाशीच्या शिक्षा मिळवून१०० पेक्षा जास्त कुटुंबांना न्याय मिळवून दिल्याने त्यांचा विशेष सत्कार आणि सन्मान पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आला.सदर कार्यक्रमास माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश आंबेकर आणि पुण्यातील प्रसिद्ध फौजदारी वकील एडवोकेट जैन एस. के. यांची सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.सदर सत्काराच्या कार्यक्रमानंतर नवीन होऊ घातलेल्या कायद्यांवर म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता , आणि भारतीय साक्ष अधिनियम या तिन्ही विषयांवर चर्चासत्राचे देखील आयोजन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते. सदर चर्चा सत्रा मध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांनी पोलीस प्रशासनाची बाजू सदर नवीन कायद्याला अनुसरून मांडली तर सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील  ॲड. प्रदीप सिंह राजपूत य...

एम के फाऊंडेशनच्या शेतकरी पीक संवाद कार्यक्रमाचे आयोजन;शेतकरी हीत यातच माझा समाधान-महादेव कोगनुरे.

Image
एम के फाऊंडेशनच्या शेतकरी पीक संवाद कार्यक्रमाचे आयोजन;शेतकरी हीत यातच माझा समाधान-महादेव कोगनुरे. दक्षिण सोलापूर चिंचपूर व नवीन टाकळी येथे आयोजित केलेल्या शेतकरी पीक संवाद कार्यक्रमास संबोधित करताना महादेव कोगनुरे. प्रतिनिधी-सोलापूर गेल्या अनेक वर्षांपासून शेतकर्यांच्या प्रशनाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.आज ही शेतकर्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.शेतकर्यांच्या हितासाठी कोणीच पुढे येताना दिसून येत नाही.यासाठीच मी कृषि मेळावा, शेतकरी कार्यशाळा,शेतकरी पीक संवाद कार्यक्रम हाती घेतला आहे.कारण मला शेतकर्यांचे हीत यातच मला समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी येथे बोलताना  केले. दक्षिण सोलापूर चिंचपूर व नवीन टाकळी येथे एम के फाउंडेशन च्या वतीने शेतकरी पीक संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी शेतकरी पीक संवाद कार्यक्रमास संबोधित करताना महादेव कोगनुरे हे बोलत होते.यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी शेतकरी पीक संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांची विविध समस्या जाणून घेतल्या.यावेळी शेत...

सोलापूर शहरातील ट्राफिक पोलीस पाल्यांने मिळवली तीन गोल्ड मेडल-पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले कौतुक.

Image
सोलापूर शहरातील ट्राफिक पोलीस पाल्यांने मिळवली तीन गोल्ड मेडल-पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले कौतुक. प्रतिनिधी - सोलापूर   सोलापूर शहर वाहतुक शाखेत कार्यरत असणारे पोलीस हवालदार/१९३ श्री राजेंद्र खाडे यांचा मुलगा रणवीर राजेंद्र खाडे , वय- १३ याने,जानेवारी २०२४ मध्ये दिल्ली येथे राष्ट्रीय अॅक्वेंटिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या शालेय संघातून तीन सुवर्णपदके प्राप्त केली.तसेच दि. ०७ जुलै ते ११ जुलै २०२४ रोजी इंदौर (मध्यप्रदेश) येथे ४० व्या ज्युनिअर आणि ५० व्या ज्युनिअर नॅशनल अॅक्वेंटिक चॅम्पियनशिप पार पडली. यामध्ये रणवीर राजेंद्र खाडे याने तीन सुवर्णपदके मिळविली.सब ज्युनिअर गटामधून तीन मीटर स्प्रिंग बोर्ड, हाय बोर्ड व ०१ मीटर स्प्रिंग बोर्ड या तिन्ही प्रकारात त्याने सुवर्णपदक प्राप्त केले.  रणवीर राजेंद्र खाडे याने ०३ सुवर्णपदक जिंकल्याने महाराष्ट्र चॅम्पियनचा हकदार ठरलेला आहे. त्याला आंतररराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांचे मार्गदर्शन लाभले.रणवीर राजेंद्र खाडे हा इयत्ता ७ वी मध्ये बी.एफ. दमाणी प्रशालेमध्ये शिकत आहे.रणवीर राजेंद्र खाडे या मुलाच्या यशाबद्दल सर्वच स्तरात...

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर मध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून बाल वारकरी ग्रंथदिंडी सोहळा संपन्न.

Image
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर मध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून बाल वारकरी ग्रंथदिंडी सोहळा संपन्न. प्रतिनिधी - अक्कलकोट,जनता संघर्ष न्यूज दि.१६/०७/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर,ता अक्कलकोट मध्ये शाळेचे मुख्याध्यापक  दत्तात्रय पोतदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली बाल वारकरी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.       याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील इयत्ता दुसरीची कु. प्राजक्ता झिंगाडे ही विद्यार्थिनी रुक्मिणी मातेच्या वेशभूषेत होती.सर्व प्रथम पालखीची पूजा करत मुख्याध्यापक दत्तात्रय पोतदार यांनी श्रीफळ वाढवून बाल वारकरी ग्रंथदिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला.वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले,पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा वातावरणात शाळेत दिंडी सोहळा रंगला.            विठ्ठल-रखुमाई  वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले.विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षिका यांनी याप्रसंगी फुगडी खेळत सोहळ्याची शोभा वाढवली.जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेच्या आयोजित दिंडीमध्ये पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग...

आषाढी वारीच्या प्रेरणेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर ड्रीम फाउंडेशन आयोजित वारी करिअरची स्तुत्य उपक्रमास शाळा-महाविद्यालयाचा उत्तम प्रतिसाद.

Image
आषाढी वारीच्या प्रेरणेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर ड्रीम फाउंडेशन आयोजित वारी करिअरची स्तुत्य उपक्रमास शाळा-महाविद्यालयाचा उत्तम प्रतिसाद. प्रतिनिधी- जनता संघर्ष न्यूज,सोलापूर आषाढी वारीच्या प्रेरणेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर ड्रीम फाउंडेशन आयोजित वारी करिअरची स्तुत्य उपक्रमास सोलापूर शहर व ग्रामीण भागात विविध शाळा महाविद्यालयातून चांगला प्रतिसाद मिळत असून त्याचाच एक भाग म्हणून  छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज सोलापूर आयोजित वारी करिअरची "दिशा समृद्ध जीवनाची"या शैक्षणिक प्रबोधन पर युवा विकास दिंडीचे मंगळवारी दि. ९ जुलै २०२४ रोजी सदर दिंडीचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मधुकर पवार यांच्या हस्ते दिंडीचे स्वागत व ग्रंथ पूजन करण्यात आले. यावेळी सदर ग्रंथ दिंडीच्या पुढील ९ दिवसांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा व उपक्रमाबद्दल राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.युवराज सुरवसे यांनी रूपरेषा सांगितली. वृक्षारोपण, समाज प्रबोधन व्याख्यान, व्यसनमुक्ती, सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपारिक वेशभूषा आणि विविध दर्शनाच्या स्पर्धा आयोजित करण्यात य...