वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी अनुभवाच्या जोरावर जिंकली लोकांची मने.

प्रतिनिधी - सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी पदावर रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी अनुभवाच्या जोरावर लोकांची मने जिंकली आहेत. दरम्यान, त्यांच्याच सूचनेनुसार वळसंगची टीम कार्यरत असल्याने सामान्य नागरिकांचा पोलिसांविषयी असलेला गैरसमज दूर झालेला आहे.जे सामान्य नागरिक पोलीस स्टेशनमध्ये जायला घाबरत होते आता ते सामान्य नागरिक आपल्या समस्या,तक्रारी घेऊन सहजरीत्या पोलीस स्टेशनमध्ये जात आहेत. याचा फायदा गुन्ह्याची उकल करण्यासाठी होत आहे. तसेच गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे.अनिल सनगल्ले हे वळसंग पोलीस ठाण्याला रुजू झाल्यापासून विविध गावातील सामाजिक उपक्रमाला भेट देऊन युवक, वृद्ध, महिला, मुलींचे मनोबल वाढवित आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारीचे निवारण अगदी सहजरीत्या होत आहे. जो सामान्य नागरिक पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास घाबरत होता, तो सामान्य नागरिक अनिल सनगल्ले यांच्यामुळे सहजरीत्या जाऊन आपले प्रश्न मांडत आहेत. यामुळे पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे. प्रत्येक समाजामध्ये सामाजिक सलोखा राहावा यास...