सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्थापित केलेल्या 'शाक्य' बहुउद्देशीय समाजसेवी संस्था,सोलापूर या संस्थेच्या प्रथम वर्धापन दिन थाटात संपन्न.

प्रतिनिधी - सोलापूर ... तर तुमच्या हातून समाजासाठी निश्चितच पायाभूत कार्य घडेल.अपर जिल्हाधिकारी - तुषार ठोंबरे. समाजात जीवन जगत असताना उत्तरदायित्वाची भावना ही चांगली गोष्ट आहे. आपल्याला केवळ प्रासंगिक कार्यक्रम करून चालणार नाही, आपल्याकडे ३६५ दिवसांचा कृती कार्यक्रम असणे आवश्यक आहे. जीवनामध्ये आपल्याला तर्कसंगत आणि विज्ञाननिष्ठा व्हायला हवं, आपण कधीही भावनेच्या आहारी जाता कामा नये, तुम्ही तर्काच्या आणि विज्ञानाच्या कसोटीवरती गोष्टी पडताळून पाहत राहिलात, तर तुमच्या हातून निश्चितच समाजासाठी पायाभूत कार्य घडेल, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्थापित केलेल्या 'शाक्य' बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, सोलापूर या संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनाचा कार्यक्रम, शुक्रवारी दुपारी पार पडला. यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक अशोक भालेराव, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक विजय परकाळे, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक महिबूब मुजावर, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयातील डॉ. औदुंबर मस्के यांची प्रमुख ...