डॉ.किर्तीपाल गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा.

प्रतिनिधी - सोलापूर
आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते,ऐतिहासिक धम्माभुमीचे प्रवक्ते,अखिल भारतीय प्रबुद्ध नाट्य परिषदेचे अध्यक्ष  कलाकार,अभिनेते,दिग्दर्शक,लेखक,पत्रकार,जेष्ठ संपादक,प्रकाशक,आयुर्वेदाचार्य,प्रबुद्ध रंगभूमीचे अध्यक्ष ज्यांनी देश हे प्रबुद्ध भारत व्हावा जातीविरहित भारत देश आपला बनावा जातीपाती नष्ट होऊन देशातील सर्व समाज एकोप्याने  एकात्मताने राहावे यासाठी गेली ४० वर्षे चळवळीसाठी प्रबुद्ध भारत घडविण्यासाठी आपले बहुमोल योगदान देत असलेले  डॉ.किर्तीपाल गायकवाड यांचा वाढदिवस दैनिक लोकशाही मतदार व पत्रकार सुरक्षा समिती वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार,प्रदेश उपाध्यक्ष बाळकृष्ण सदाफुले, सोलापूर जिल्हाअध्यक्ष दत्तात्रय पवार, दैनिक लोकशाही मतदारचे कायदेशीर सल्लागार ॲड.दिलीप जगताप,आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते अशोक साबळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून मिठाई सत्कार करण्यात आला.
डॉ.किर्तीपाल गायकवाड हे एक आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते निष्ठावंत कार्यकर्ते -यशवंत पवार.
डॉ.किर्तीपाल गायकवाड हे एक आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी आजतागायत बहुजन विचारधारेच्या लोकांना एकत्र करण्याचे काम केले असून सदैव मैत्रीपूर्ण भावना आणि समाजभान जपणारे असे गायकवाड यांची प्रतिमा असून त्यांनी देशात एकोपा राहण्यासाठी आंबेडकरी चळवळीची ज्योत कायम तेवत ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करत डॉ.किर्तीपाल गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त व पुढीलवाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आंबेडकरी चळवळची शान डॉ.किर्तिपाल गायकवाड - बाळकृष्ण सदाफुले.
डॉ. किर्तिपाल गायकवाड हे आंबेडकरी चळवळीसाठी आपले आयुष्य वेचले असून एक निष्ठावंत प्रामाणिक असे त्यांचे व्यक्तिमत्त्व असून कायम इतरांना मदत करण्यासाठी एक हात पुढे असतात नेहमीच वेगवेगळे समाज प्रबोधनात्मक उपक्रम राबवत असतात त्यांनी हीच ऊर्जा  चळवळीसाठी आणि समाज प्रबोधनासाठी कायम ठेवावी आणि अनेक कार्यकर्ते हे देशाच्या भवितव्यासाठी घडवावे असे भावना व्यक्त करत सदाफुले यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या 
डॉ.किर्तिपाल गायकवाड एक विस्तृत व्यक्तिमत्त्व - दत्तात्रय पवार.
गायकवाड साहेबांनी आजपर्यंत गोरगरीब लोकांसाठी अठरापगड जातींसाठी लढा देत आले असून त्यांनी आजपर्यंत अन्यायाविरुद्ध आंबेडकरी चळवळ असो वा पत्रकारितेच्या माध्यमातून असो त्यांनी अनेकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला असून विविध क्षेत्रात त्यांचे काम असून गायकवाड एक विस्तृत व्यक्तिमत्त्व आहेत त्यांनी आपले हे समाज उपयोगी उपक्रम व चळवळ कायम आबादित ठेवावे असे शुभेच्छापर बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या
डॉ.किर्तिपाल गायकवाड हे चळवळीसाठी आपले आयुष्य त्यागलेले व्यक्तिमत्त्व - अशोक साबळे.
किर्तीपाल गायकवाड हे माझे मेव्हणे असून त्यांना मी अगदी जवळून पाहिलो असून त्यांनी आंबेडकरी चळवळी साठी आपली मोठी सरकारी नोकरी त्यागण्याचे धाडस केले असून आजपर्यंत फक्त आणि फक्त चळवळीसाठी आणि देश हा प्रबुद्ध भारत घडविण्यासाठी धडपड करत असून नुकताच त्यांच्या या कामाची दाखल घेऊन मलेशिया मधून गायकवाड यांना पुरस्कार भेटले असून नेहमी समाजासाठी देशासाठी चळवळीसाठी धडपडणारा व्यक्तिमत्त्व असून अशीच तळमळ व निष्ठा चळवळीप्रती कायम राहावी असे सांगत  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
 या सत्कार समारंभ प्रसंगी  दैनिक लोकशाही मतदार चे युवा संपादक अक्षय बबलाद,श्रीकांत कोळी,सिद्धार्थ भडकुंबे, सादिक शेख,राम हुंडारे,कादर शेख,युन्नुस अत्तार,विनायक कोरे, अजहर बिजापूरे,मिनाज इंगळगी,परवेज मुल्ला,वैजिनाथ बिराजदार,महेबुब कादरी,पवार आदी पत्रकार बांधव व मित्रपरिवार उपस्थित होते.
------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर