अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील सामाजिक व एकनिष्ठ भाजप कार्यकर्ते-जनसेवक मा.श्री.ॲड.दयानंद उंबरजे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम संपन्न.
प्रतिनिधी -सोलापूर
अक्कलकोट तालुक्यातील सामाजिक व एकनिष्ठ भाजप कार्यकर्ते- जनसेवक मा.ॲड.श्री.दयानंद (साहेब)उंबरजे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.४ सप्टेंबर२०२३ रोजी मौजे करजगी येथे भव्य नागरिक सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विद्यमान नगरसेवक मा मिलन दादा कल्याण शेट्टी तसेच पंचक्रोशातील भाजप कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ॲड.श्री दयानंद उंबरजे साहेबांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ फेटा बांधून भव्य असा सत्कार करण्यात आला. दरम्यान ॲड.श्री दयानंद उंबरजे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध विधायक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उदा.नविन मतदार नाव नोंदणी अभियान,शासन आपल्या दारी उपक्रम, वृक्षारोपण कार्यक्रम,विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,संजय गांधी निराधार योजना,भव्य रक्तदान शिबीर,भव्य आरोग्य तपासणी शिबीर.विध्यार्थ्यांसाठी निबंध /चित्रकला व रांगोळी स्पर्धा आदी.विशेषतः वाढदिवसादिवशी मेघ गर्जनेसह दिवस भर पाऊस चालू होता.परंतु दयानंद उंबरजे साहेब यांच्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या चाहत्यांची वाढदिवसानिमित्त मोठी गर्दी होती.
अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ,कणबस, कलहिप्परगे, जेऊर अंकलगी घुंगरेगाव,शावळ,आलेगाव,हंद्राळ,पानमंगरूळ दोड्याळ तसेच सोलापूर शहरातील नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते. रक्तदान शिबिरात साधारण ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले.तसेच आरोग्य शिबिर तपासणी अंतर्गत १०० लोकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.यावेळी गावातील महिला बचत गटाच्या वतीने रक्षाबंधनाचा सण देखील साजरा करण्यात आला. महिलानी ॲड.दयानंद उंबरजे साहेबांना राख्या बांधल्या व वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिम नगर,करजगी गावातील मुले -मुली कन्नड व मराठी माध्यमातील जिल्हा परिषद शाळेत निबंध,चित्रकला व रांगोळी सर्व स्पर्धा कलेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सहभागी सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात शालेय साहित्य व रोख रक्कम देण्यात आले.
यावेळी शिक्षक व इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उंबरजे साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला.मा.ॲड.श्री.दयानंद (साहेब)उंबरजे श्री.गुड्डू महास्वामीजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन.वाढदिवसानिमित्त पंचक्रोशीतील आलेले सर्व भाजप कार्यकर्ते साहेब प्रेमी,निष्ठावंत कार्यकर्ते,शेतकरी बांधव व युवा वर्ग यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
लोकांच्या मनात ॲड.श्री.दयानंद उंबरजे साहेबांबद्दल असलेला आदरभाव, प्रेम,निष्ठा पाहून मा.ॲड.दयानंद उंबरजे साहेब भारावून गेले.वाढदिसनिमित्त आलेल्या सर्व लोकांचे उंबरजे साहेबांनी मनोगत रूपी विचार व्यक्त केले ते असे म्हणाले की,आपण सर्वांनी भर पावसात येऊन माझ्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे.अशीच सदैव खंबीर साथ आपली माझ्या पाठीशी असू द्या.असेच प्रेम माझ्यावर राहू द्या.
सदरच्या या वाढदिवस कार्यक्रमाप्रसंगी परगाहून असलेल्या सर्व लोकांची सकाळ ते सायंकाळपर्यंतची नाश्ता,चहा-पानाची व जेवणाची व्यवस्था गौरव समितीकडून करण्यात आले होती.
तसेच श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित सर्व शाळा व सर्व विभाग अंतर्गत शाळेतील शिक्षकांनी मा.ॲड.श्री.दयानंद उंबरजे साहेबांचा सत्कार केला.याप्रसंगी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासमवेत करजगी पंचक्रोशातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गौरव समिती,करजगी पंचक्रोशातील ग्रामस्थ व भाजप कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले.
सदरच्या या वाढदिवस कार्यक्रमाप्रसंगी परगाहून असलेल्या सर्व लोकांची सकाळ ते सायंकाळपर्यंतची नाश्ता,चहा-पानाची व जेवणाची व्यवस्था गौरव समितीकडून करण्यात आले होती.
तसेच श्री बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित सर्व शाळा व सर्व विभाग अंतर्गत शाळेतील शिक्षकांनी मा.ॲड.श्री.दयानंद उंबरजे साहेबांचा सत्कार केला.याप्रसंगी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासमवेत करजगी पंचक्रोशातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गौरव समिती,करजगी पंचक्रोशातील ग्रामस्थ व भाजप कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले.
------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240