वटवृक्ष स्वामींचे दर्शन घेऊन धन्य झाले - पंकजाताई मुंडे
![]() |
पंकजाताई मुंडेंचा सत्कार करताना आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, देवस्थानचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे, नगरसेवक महेश हिंडोळे व अन्य दिसत आहेत. |
प्रतिनिधी - अक्कलकोट
आज पर्यंत राजकीय जीवन प्रवासात देशातील विविध ठिकाणी भेटी देण्याचा योग आला. अनेक ठिकाणी श्री स्वामी समर्थांची मंदिरे आमच्या निदर्शनास आली आहेत. त्या ठिकाणी तात्काळ जाऊन आम्ही स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायचो, परंतु आज श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येऊन स्वामींचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले म्हणून आजचा हा दिवस माझ्या जीवनातील विशेष दिवस आहे. कारण स्वामी समर्थांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या व स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या वटवृक्ष मंदिरातील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन माझे जीवन धन्य झाले असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस
पंकजाताई मुंडे यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या अधिपत्याखाली देवस्थानचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे व आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी पंकजाताई मुंडेंचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, श्रींची मूर्ती देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी बोलताना मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढे बोलताना पंकजाताई यांनी श्री स्वामी समर्थांच्या वटवृक्ष मंदिरातील हे रमणीय परिसर, प्रसन्न वातावरण, स्वामी समर्थांची मन-चित्त प्रसन्न करणारी दर्शन मूर्ती हे सारेच अद्भुत आहे. मला येथे पुन्हा पुन्हा स्वामी दर्शनाकरिता येण्याची इच्छा होईलच. ज्या ज्या वेळी मला स्वामी दर्शनाची इच्छा होईल त्यावेळी स्वामींनी त्यांच्या दर्शनाकरिता आपल्याला येथे बोलावून घ्यावे व मला स्वामी दर्शनाची संधी उपलब्ध करून द्यावी असे सांगून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या धार्मिक कार्याचा विस्तार पाहून मंदिर समितीच्या कार्याचा शब्दात्मक गौरव केला. यावेळी आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, मंदार महाराज पुजारी, नगरसेवक महेश हिंडोळे, प्रभाकर मजगे, मल्लिनाथ स्वामी, शिवशरण जोजन, मोतीराम राठोड, नन्नू कोरबू, राहुल ढोबळे, राहुल वाडे, दयानंद बिडवे, नागु कुंभार, अविनाश मडिखांबे, धनंजय गाढवे, मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, ऋषिकेश लोणारी, संजय पवार, प्रसाद सोनार, आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.
------------------------------------
▪️जनता संघर्ष न्यूज ▪️संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
▪️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240