Posts

तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदिरात दत्तयाग संपन्न.

Image
प्रतिनिधी - अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष मंदिरातश्रावण अधिक मास निमीत्त आयोजीत ३ दिवसीय दत्तयाग दिनांक २५ जुलै ते दिनांक २७ जुलै अखेर मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाला. इंगळे कुटुंबीयांच्या तिसऱ्या पिढीचे मानकरी स्वामी सेवक व मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, रूपाली इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत चोळप्पा महाराजांचे वंशज प.पू.मोहनराव पुजारी यांच्या अधिपत्त्याखाली व प.पू.मंदार महाराज पुजारी व मुग्धा पुजारी, मोहित महाराज पुजारी यांच्या हस्ते बदलापूरचे प्रसाद गुरुजी व ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात  हा दत्तयाग संपन्न झाला. दिनांक २५ जुलै रोजी सकाळी ७ : ३० ते ८:३० या वेळेत गणपती कुलेष्ट देवता, वास्तू देवता, ग्रामदेवता आवाहन, सकाळी ८ : ३० ते ९ : ३० या वेळेत आचमन, प्राणायाम, मंगलाचरण, देवता गुरुवंदन शांतीपाठ, प्रायश्चित संकल्प, गोमाता पूजन, विष्णुपूजन, पंचगव्य प्राशन, यज्ञोपवित धारण, यथाशक्ती गोदान संकल्प, याग संकल्प, सकाळी ९ : ३० ते ११ या वेळेत गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, वसोर्धरा पूजन, नांदीश्राद्ध, सकाळी ११ ते ११ : ३० या वेळेत आचार्यादी, ऋत्वीज्वरण, ब्राह्मण पूजन,...

कॉ.नारायणराव आडम यांच्या स्मृतिदिनी ५१८ रक्तदात्यांनी केले रक्तदान!

Image
प्रतिनिधी - सोलापूर     सोलापूरातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापकीय सदस्य, स्वातंत्र्यसैनिक कॉ.नारायणराव आडम यांच्या स्मृतिदिनीचे औचित्यसाधून दरवर्षी प्रमाणे यंदाही २६ जुलै रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पक्षाचे कार्यालय दत्त नगर येथे  माकप चे जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख व अशोक इंदापुरे यांच्या हस्ते तर कॉ.गोदूताई परुळेकर नगर कुंभारी येथे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व माजी नगरसेविका कॉ कामिनीताई आडम यांच्या हस्ते करण्यात आले.   सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी रे नगर चेअरमन कॉ.नलिनीताई कलबुर्गी, माजी नगरसेविका नसीमा शेख , व्यकंटेश कोंगारी, सिद्धप्पा कलशेट्टी, युसूफ शेख मेजर, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, कुरमय्या म्हेत्रे, मुरलीधर सुंचू,विल्यम ससाणे विक्रम कलबुर्गी,अँड.अनिल वासम,  हसन शेख, दाऊद शेख, नरेश दुगाणे लिंगवा सोलापूरे, शकुंतला पानिभाते, विरेंद्र पद्मा, दीपक निकंबे, सनी शेट्टी,  आप्पाशा चांगले, रफिक काझी, मधुकर चिल्लाळ, अकील शेख, इलियास सिद्दीकी, दत्ता चव्हाण,बाळकृष्ण मल्याळ, नरेश गुल्लापल्ली,आसिफ पठाण, ...

गायक मोहंम्मद अयाज यांच्या "अली के दुलारे हुसैन"ध्वनि चित्रफीतचे मा.सुशिलकुमार शिंदे साहेब यांच्या हस्ते प्रकाशन.

Image
प्रतिनिधी - सोलापूर महाराष्ट्राचे महानायक तथा सोलापूर चे ब्रंन्ड अम्बेंसिडर मोहम्मद अयाज यांच्या 'अली के दुलारे हुसैन करबला में सर कटाये हुसैन' या ध्वनि चित्रफीतीचे प्रकाशन देशाचे माजी गृहमंत्री मा.सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. झी म्यूजिक प्रस्तुत अली मौला के दुलारे हुसैन मोहर्रम चे औचित्य साधुन हा अल्बम तयार करण्यात आला असुन याचे गायक/संगीतकार/ गीतकार मोहम्मद अयाज आहेत.याचे संगीत संयोजन साहिर नदाफ व ध्वनि मुद्रण प्रकाश माने यांनी केले आहे. गुरुवार दिनांक २७ जुलै,२०२३ रोजी मुंबई येथे प्रकाशन सोहळा पार पडला. ------------------------------------ ▪️जनता संघर्ष न्यूज ▪️ संपादक-सिध्दार्थ भडकुंबे ▪️ बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई सलग्नित श्री स्वामी समर्थ संगीत विद्यालय,अक्कलकोट संगीत विद्यालाच्या केंद्र संचालक पदी मयूर स्वामी यांची निवड.

Image
प्रतिनिधी - अक्कलकोट अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई सलग्नित श्री स्वामी समर्थ संगीत विद्यालय,अक्कलकोट या संगीत विद्यालाचे केंद्र संचालक पदी मयूर स्वामी यांची निवड करण्यात आली असून सदर निवड अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या मार्फत करण्यात आली आहे. श्री स्वामी समर्थ संगीत विद्यालय, क्कलकोट हे अक्कलकोट येथील सर्वात जुने व एकमेव संगीत केंद्र आहे. या विद्यालयातून अनेक विध्यार्थ्यांनी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. शास्त्रीय संगीताचे थोर उपासक संगीतालंकार कै.शरणप्पा कलबुर्गी हे या विद्यालयाचे संस्थापक व केंद्र संचालक म्हणून काम पाहत होते.त्यांच्या पश्चात हे पद मयूर स्वामी यांच्या कढे सोपवण्यात आली आहे. या बद्दल शंकर लंगोटे, श्रीमती कुंदा नखाते, प्रभूलिंग कलबुर्गी, अशोक कडगंची, मल्लिनाथ स्वामी, वीरंणा कलबुर्गी, मनीषा करंदीकर, संतोष वगाले, चंद्रकांत डांगे, नागनाथ चव्हाण, अक्षय सरदेशमुख,ओंकार पाठक, आदित्य जोशी आणि महेश स्वामी आदींनी अभिनंदन केले. ------------------------------------ ▪️जनता संघर्ष न्यूज ▪️ संपादक-सिध्दार्थ भडकुंबे ▪️ बातम्या व जाहिरात...

लहूजी शक्ती सेनेच्या युवा आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी सुरज सकटे यांची निवड.

Image
लहूजी शक्ती सेनेच्या युवा आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी सुरज सकटे यांची निवड. प्रतिनिधी - पंढरपूर , जयसिंग मस्के   लहुजी शक्ती सेना पंढरपूर युवक तालुकाध्यक्ष पदी कोर्टी ता.पंढरपूर येथील सुरज सकटे यांची निवड करण्यात आली. ल.श सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव मा. देविदास कसबे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष मा.मुकुंद घाडगे,ता.उपाध्यक्ष- शरद लोखंडे,समाधान वायदंडे,तालुका संघटक मा.बाळासाहेब वायदंडे,राजु कसबे,बापु साठे,धनाजी वायदंडे,आकाश सकटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ------------------------------------ ▪️जनता संघर्ष न्यूज ▪️ संपादक-सिध्दार्थ भडकुंबे ▪️ बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०