Posts

कुटुंबाला एकसंघ ठेवण्याचा आदर्श हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्यच- सिने अभिनेत्री अलका कुबल

Image
    मुरूम- प्रतिनिधी मुलांना संस्कारयुक्त बनविताना पालकांनी स्वतः आई-वडील, सासू-सासरे व वडीलधारी मंडळींचा आदर, निस्वार्थ सेवाभाव जोपासून त्यांना आपल्या कुटुंबाच्या परंपरा आणि ज्येष्ठांचा त्याग, परिश्रम व कष्ट याची जाणीव करून देणे. समाजात आपले कुटुंब अधिक सुसंस्कारित बनवून ते अधिक मजबूत व एकसंघ ठेवण्याचा आदर्श हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्यच असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी केले.          रोटरी क्लब मुरूम सिटी च्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा गौरव सोहळा रत्नमाला मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता. ५) रोजी आयोजित सोहळ्यात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम कुलकर्णी होते. यावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, सचिव कल्लाप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले.  यावेळी अनुसया मिरकले, वैभव वेल्हाळ, संगीता माकणे, तनुजा गाढवे, दत्ता राठोड, प्रिया वाकड...

त्रिमूर्ती गणेश मंडळ, मुस्ती येथे गणेशपूजन सोहळा उत्साहात-पूजेचा मान उळे गावचे उपसरपंच तथा सह्याद्री फाउंडेशन अध्यक्ष नेताजी(भाऊ) खंडागळे यांना.

Image
प्रतिनिधी-सोलापूर दि.1सप्टेंबर, 2025 रोजी त्रिमूर्ती गणेश मंडळ मुस्ती येथे गणेशपूजन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी गणपती बप्पांच्या पूजेचा मान उळे गावचे उपसरपंच तथा सह्याद्री फाउंडेशन अध्यक्ष नेताजी(भाऊ) खंडागळे यांना देण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाच्या वतीने नेताजी(भाऊ)खंडागळे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या हस्ते छोट्या मुला-मुलींनी सादर केलेल्या टाळवादन व नृत्यप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या सादरीकरणामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. यानंतर श्रींची आरती संपन्न झाली. कार्यक्रमाला त्रिमूर्ती गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ---------------------------------------- 🔹जनता संगर्ष न्यूज, सोलापूर  ▪️संपादक -सिद्धार्थ भडकुंबे 

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिर.

Image
प्रतिनिधी -सोलापूर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. ३ सप्टेंबर) मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने होटगी रोडवरील विकास नगर येथील रत्नदीप हाउसिंग सोसायटी शेजारील शाळा परिसरात घेण्यात येणार आहे. या शिबिराचा शुभारंभ सकाळी १०:३० वाजता होणार असून यात रक्त तपासणी (CBC), रक्तदाब तपासणी, मधुमेह (शुगर) तपासणी, नेत्र तपासणी आदी सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्या सीमा श्रीगोंदेकर-यलगुलवार यांनी केले आहे.

श्री वटवृक्ष मंदिरामुळे स्वामी समर्थांची कीर्ती सर्वदूर - न्यायाधीश ईश्वर सुर्यवंशी.

Image
न्यायाधीश ईश्वर सुर्यवंशी यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत. प्रतिनिधी-अक्कलकोट  श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मुळे व स्वामी समर्थांच्या जागृत वास्तव्यामुळे अनेक भाविकांना स्वामींच्या कार्याची प्रचिती येत आहे. या प्रचितीमुळेच भाविकांचा कल स्वामी दर्शनाकडे नित्य वाढतच आहे. येथील वटवृक्ष मंदिरातील उत्कृष्ट व्यवस्थापन, नियोजनबद्ध दर्शनसेवा, विनम्रभावे आदरितिथ्य या सर्व आध्यात्मिक पैलुंमुळे अक्कलकोट तीर्थक्षेत्र हे आज मितीस सर्वोच्च स्थानावर आहे. या निमित्ताने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमुळे स्वामी समर्थांची कीर्ती सर्व दूर पसरली असल्याचे मनोगत सोलापूरचे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ईश्वर सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी न्यायाधीश ईश्वर सुर्यवंशी  यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी न्यायाधीश ईश्वर सुर्यवंशी बोलत होते. याप्रसंगी श्रीशैल गवं...

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनात सातत्य-माजी आयुक्त राजेंद्र भोसले यांचे मनोगत.

Image
मा.आयुक्त पुणे महापालिका राजेंद्र भोसले यांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, तहसीलदार विनायक मगर व अन्य मान्यवर. प्रतिनिधी-अक्कलकोट येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पुणे महानगरपालिकेचे सेवानिवृत्त आयुक्त तथा भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी (IAS) आणि सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे सहकुटुंब देवस्थानास भेट देण्यासाठी आले होते. दर्शनानंतर व्यक्त केलेल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “अनेक वर्षांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन लाभले. हे दर्शन माझ्या व कुटुंबासाठी संस्मरणीय ठरले आहे. श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र मिळणे ही आमच्यासाठी विशेष बाब आहे. एकंदरीत देवस्थान समितीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनात पुर्वीसारखेच सातत्य असून मंदिरातील शिस्त, स्वच्छता आणि प्रसन्न वातावरण स्तुत्य आहे.” याप्रसंगी देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांनी माजी आयुक्त राजेंद्र भोसले यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. कार्यक्रमाला तहसीलदार विनायक मगर, तलाठी सुहास डोईफोडे, देवस्थान सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शि...