कुटुंबाला एकसंघ ठेवण्याचा आदर्श हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्यच- सिने अभिनेत्री अलका कुबल

मुरूम- प्रतिनिधी मुलांना संस्कारयुक्त बनविताना पालकांनी स्वतः आई-वडील, सासू-सासरे व वडीलधारी मंडळींचा आदर, निस्वार्थ सेवाभाव जोपासून त्यांना आपल्या कुटुंबाच्या परंपरा आणि ज्येष्ठांचा त्याग, परिश्रम व कष्ट याची जाणीव करून देणे. समाजात आपले कुटुंब अधिक सुसंस्कारित बनवून ते अधिक मजबूत व एकसंघ ठेवण्याचा आदर्श हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्यच असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी केले. रोटरी क्लब मुरूम सिटी च्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांचा गौरव सोहळा रत्नमाला मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता. ५) रोजी आयोजित सोहळ्यात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम कुलकर्णी होते. यावेळी रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, सचिव कल्लाप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी अनुसया मिरकले, वैभव वेल्हाळ, संगीता माकणे, तनुजा गाढवे, दत्ता राठोड, प्रिया वाकड...