पत्रकार कृती समिती व अप्पासाहेब लंगोटे मित्र परिवारतर्फे पत्रकार इरफान शेख व प्रहारचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

प्रतिनिधी -सोलापूर महाराष्ट्र टाईम्सचे सोलापूर शहर प्रतिनिधी इरफान शेख आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी यांचा वाढदिवस पत्रकार कृती समिती व अप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद आवारातील हिरवळ येथे पार पडलेल्या या सोहळ्यात शाल, टोपी, पुष्पहार घालून व पेढे भरवून दोन्ही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्वांच्या शुभेच्छांच्या वातावरणात वाढदिवसाचे औचित्य साजरे झाले. वाढदिवसानंतर पत्रकार इरफान शेख आणि जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी आयोजक पत्रकार कृती समिती व अप्पासाहेब लंगोटे मित्र परिवार यांचे मन:पूर्वक आभार मानले. या कार्यक्रमाला अप्पासाहेब लंगोटे, सैफन शेख, युनूस अत्तार, नाना प्रक्षाळे, डि. डि. पांढरे, अस्लम नदाफ, नितीन करजोळे, सिद्धाराम नंदर्गी, विजयकुमार बाबर, रवि ढोबळे, विशाल भांगे, राजेंद्र कांबळे, शेखर बंगाळे, यासिन शेख, हुजेफ इनामदार, नागेश पासकंटी, जाफर सगरी यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.