Posts

भाविकांसाठी वटवृक्ष मंदीरात स्वामी दर्शनाची व्यवस्था उत्कृष्ट पध्दतीची;श्री.स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांचे मनोगत.

Image
पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक व कुदूंबियांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत. प्रतिनिधी-अक्कलकोट           श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेले अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे स्वामींचे वास्तव्य असलेले जागृत स्थान आहे. स्वामी समर्थांच्या भक्तीतून अनेक भाविकांना विविध माध्यमातून स्वामींच्या आशीर्वादाची प्रचिती येत आहे. भाविकांसाठी वटवृक्ष मंदीरात स्वामी दर्शनाची व्यवस्था उत्कृष्ट पध्दतीची असल्याचे मनोगत ठाण्याचे  अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास परिवार सदस्यांसह भेट देवून श्री.स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक व कुटूंबियांचा श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक बोलत होते. पुढे बोलताना पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची सेवा म्हणजे उल्लेखनीय बाब असल्य...

जनसेवक अविनाश मडीखांबे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा.

Image
प्रतिनिधी-सोलापूर सामाजिक जाणीव जपत, समाजातील गरजू बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा सुंदर उपक्रम जनसेवक अविनाश मडीखांबे यांच्या वाढदिवसानिमित्त साकारण्यात आला. अंगणवाडीतील लहान मुलांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले. हा स्तुत्य उपक्रम अजय मुकणार यांच्या वतीने राबविण्यात आला.याप्रसंगी  उपस्थित विविध क्षेत्रातील  मान्यवरांनी  अविनाश मडीखांबे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

गुरुपौर्णिमेनिमीत्त गुरु मंदिरात वीणा सप्ताहास प्रारंभ. प्रथमेश इंगळेंच्या हस्ते वीणा पूजन व शुभारंभ.

Image
गुरू मंदिरात नामवीणा सप्ताहाची सुरुवात करताना प्रथमेश इंगळे, व इतर दिसत आहेत. प्रतिनिधी-अक्कलकोट श्री गुरू मंदीरात गुरूपौर्णिमा उत्सव सालाबादाप्रमाणे यंदाही मोठया भक्तीभावात व अपार श्रध्देने साजरा होत आहे. या निमित्त सालाबादा प्रमाणे याही वर्षी अखंड नामवीणा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या नामवीणा सप्ताहाची सुरुवात येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या अधिपत्त्याखाली त्यांचे सुपूत्र प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते वीणापुजन व नामजपाने करण्यात आली. याप्रसंगी बोलताना प्रथमेश इंगळे यांनी स्वामी समर्थांचे परमशिष्य श्री बाळप्पा महाराज यांचे हे मठ आहे. सद्गुरू गजानन महाराजांचे हे स्थान आहे. अशा पवित्र स्थानी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांसह अखंड नामविणा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या नामवीणा सप्ताहाचे पुजन व शुभारंभ करण्याचे मान माझ्या आजोबांपासून इंगळे कुटूंबीयांना आहे. इंगळे कुटूंबीयांच्या वतीने या नामवीणा सप्ताहाची सुरुवात करण्याची ही आमची चौथी पिढी आहे. यापुर्वी सर्वप्रथम कै.शिवाजीराव इंगळे यांनी याच...

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी वारकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून आस्थेने केली चौकशी...

Image
प्रतिनिधी -पंढरपूर, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे येत आहेत. त्यांच्या सोयी-सुविधांची पाहणी करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुलदीप जंगम पंढरपूर येथे दाखल झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विविध ठिकाणी विसावा छावण्या, पाण्याची व स्वच्छतेची व्यवस्था, तसेच आरोग्य शिबिरांची पाहणी केली. त्यांनी अनेक वारकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या."वारकऱ्यांची सेवा हे आपले कर्तव्य आहे," असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त करत, उर्वरित कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिल्या. पंढरपूर नगरपरिषद, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन व स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त सहकार्याने वारी यशस्वी होण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले.

रोहीणी तडवळकर यांचा सत्कार व शुभेच्छा.

Image
प्रतिनिधी-सोलापूर सोलापूर शहर भाजपाच्या नूतन शहराध्यक्षा पदी मा.रोहीणी तडवळकर यांची निवड झाल्याबद्दल . ॲडव्होकेट दयानंद उंबरजे(जिल्हा उपाध्यक्ष - भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभाग, सोलापूर जिल्हा) यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ॲडव्होकेट उंबरजे साहेबांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला भाजपा पक्षाचे इतर अनेक मान्यवरही उपस्थित होते.