गुरुपौर्णिमेनिमीत्त गुरु मंदिरात वीणा सप्ताहास प्रारंभ. प्रथमेश इंगळेंच्या हस्ते वीणा पूजन व शुभारंभ.

गुरू मंदिरात नामवीणा सप्ताहाची सुरुवात करताना प्रथमेश इंगळे, व इतर दिसत आहेत.
प्रतिनिधी-अक्कलकोट
श्री गुरू मंदीरात गुरूपौर्णिमा उत्सव सालाबादाप्रमाणे यंदाही मोठया भक्तीभावात व अपार श्रध्देने साजरा होत आहे. या निमित्त सालाबादा प्रमाणे याही वर्षी अखंड नामवीणा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या नामवीणा सप्ताहाची सुरुवात येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या अधिपत्त्याखाली त्यांचे सुपूत्र प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते वीणापुजन व नामजपाने करण्यात आली. याप्रसंगी बोलताना प्रथमेश इंगळे यांनी स्वामी समर्थांचे परमशिष्य श्री बाळप्पा महाराज यांचे हे मठ आहे. सद्गुरू गजानन महाराजांचे हे स्थान आहे. अशा पवित्र स्थानी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांसह अखंड नामविणा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या नामवीणा सप्ताहाचे पुजन व शुभारंभ करण्याचे मान माझ्या आजोबांपासून इंगळे कुटूंबीयांना आहे. इंगळे कुटूंबीयांच्या वतीने या नामवीणा सप्ताहाची सुरुवात करण्याची ही आमची चौथी पिढी आहे. यापुर्वी सर्वप्रथम कै.शिवाजीराव इंगळे यांनी याची सुरुवात केली. यानंतर कै. कल्याणराव इंगळे यांनी या नामवीणा सप्ताहाची धुरा अनेक वर्षे समर्थपणे चालविली. हीच परंपरा मागील ९ वर्षापासून जोपासून या नामवीणा सप्ताहाच्या माध्यमातून इंगळे कुटूंबीयांच्या वतीने अखंड गुरू सेवा घडत असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी गुरु मंदिराच्या वतीने प्रथमेश इंगळे यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गुरु मंदिरचे महेश जोशी, शंकर जरीपटके, दिगंबर पत्की, अप्पासाहेब बनसोड, आनंद कुंभार, महावीर खोबरे, सोपानराव गोंडाळ, गिरीश पवार इत्यादी उपस्थित होते.
 

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर