सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी वारकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून आस्थेने केली चौकशी...

प्रतिनिधी -पंढरपूर,
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे येत आहेत. त्यांच्या सोयी-सुविधांची पाहणी करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कुलदीप जंगम पंढरपूर येथे दाखल झाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विविध ठिकाणी विसावा छावण्या, पाण्याची व स्वच्छतेची व्यवस्था, तसेच आरोग्य शिबिरांची पाहणी केली. त्यांनी अनेक वारकऱ्यांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या."वारकऱ्यांची सेवा हे आपले कर्तव्य आहे," असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त करत, उर्वरित कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिल्या.
पंढरपूर नगरपरिषद, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन व स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त सहकार्याने वारी यशस्वी होण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले.

Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर