Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी - समीर गायकवाड.

Image
प्रतिनिधी-सोलापूर जिल्हा परिषदेत व्याख्यान.... पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रेरणादायी आहे.  असे मत साहित्यिक  समीर गायकवाड यांनी व्यक्त केले.  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती निमीत्त  साहित्यिक  समीर गायकवाड यांचे राजमाता आहिल्यादेवी होळकर आणि त्यांचा जीवन प्रवास या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करणेत आले होते.  जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात घेणेत आलेले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थांनी सिईओ कुलदीप जंगम हे होते.  राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने दिनांक 30 मे 2025 रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात साजरी करण्यांत आली . मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या शुभहस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करणेत आले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर , उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव,  मुख्य लेखा व वित्त अधिकारी मनिषा वाकडे, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता नरेंद्र  खराडे, लेखाधिकार...

दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक/पत्रकार शरीफ सय्यद यांना मातृशोक.

Image
प्रतिनिधी-सोलापूर दै निक पुण्यनगरीचे उपसंपादक शरीफ सय्यद यांच्या मातोश्री सायराबानो चांदसाहेब सय्यद यांचे अल्प आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७८ वर्ष होते. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९४७ रोजी झाला होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून -नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवार २८ मे रोजी सायंकाळी पाच वाजता सोलापूर शहरातील मोदी कब्रस्तान येथे दफन विधी करण्यात येणार आहे. त्यांची अंत्ययात्रा होटगी रोड येथील सहारा नगर -१ येथील त्यांच्या निवासस्थानावरून निघणार आहे.

अखिल भारतीय मजदूर कल्याण संघ तथा राष्ट्रीय एकता संघाचा ४३ वा वर्धापन दिन थाटात साजरा.

Image
प्रतिनिधी-सोलापूर दि.२० मे २०२५ रोजी  अखिल भारतीय मजदूर कल्याण संघ तथा राष्ट्रीय एकता संघाचा ४३ वा वर्धापन दिन सोलापुरातील समाजकल्याण केंद्र या ठिकाणी अ.भा.म.क.संघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विधि अधिकरी सहा.पोलीस आयुक्तालय वर्ग,१ सोलापूरचे प्रा.ॲड.अरविंद देडे,अ.भा.म.क.सेवा संघाचे राष्ट्रीय महासचिव नंदकुमार दिड्डी, अ.भा.म.क.सेवा संघाचे केंद्रीय सदस्य माणिक गावडे, भारतीय रिजर्व बँकेचे  सेवानिवृत्त अधिकारी तथा कोषाध्यक्ष दिलीप कदम,जिल्हाध्यक्ष गंगाधर खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते  भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकाचे पुष्प अर्पण अभिवादन करण्यात आले.व पर्यावरण पूरक संदेश म्हणून रोपाला पाणी घालून कार्यक्रमास उपस्थित सर्वांनीच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिकरित्या वाचन केले. दरम्यान प्रमुख पाहुण्यांचा भारतीय संविधानाची प्रत,शाल व बुके देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष गंगाधर खंडागळे यांनी केले.प्रास्ताविकात गंगाधर खंडागळे यांनी अ....

महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेच्यावतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना निवेदन सादर.

Image
प्रतिनिधी-सोलापूर सोलापूर आरोग्य केंद्रात नेटवर्क आणि इतर समस्यामुळे फेस रिडींग होत नाही. त्यामुळे वेतन प्रणालीसाठी बंधनकारक करू नका असे निवेदन महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेच्यावतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांना देण्यात आले. आयुक्त आरोग्य सेवा यानी मार्च २०२५ च्या पत्रानुसार १ एप्रिल २०२५ पासून आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे वेतन बायोमेट्रीक व फेस रिडिंग हजेरी नुसार करण्याचे आदेश दिले आहे. त्या संदर्भाने राज्यातील काही उपसंचालक व जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिकारी हे कर्मचारी यांनी बायोमेट्रीक व फेस रिडिंग प्रणाली द्वारे हजेरी न लावल्यास वेतन काढले जाणार नाही असे आदेश वारंवार काढून आम्हा महिला कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे, दबावाचे वातावरण निर्माण करीत आहेत. बायोमेट्रीक व फेस रिडिंग बाबत अद्याप कोणताही शासन आदेश नाही, पॅरामेडिकल तांत्रिक क्षेत्रीय महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचे कामाचे तास निश्चित नाहीत, प्रा.आ. केंद्र, उपकेंद्र येथे आंतररुग्ण विभाग व फिरती करुन कार्यक्षेत्रात सेवा दयावी लागते.अनेक प्रसंगी तातडीची तात्काळ वैद्यकिय सेवा...

कारेगावच्या विद्यमान सरपंच निर्मला शुभम नवले स्वामींचारणी नतमस्तक

Image
प्रतिनिधी-अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे कारेगावच्या विद्यमान सरपंच निर्मला शुभम नवले, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र राज्य यांनी मनोभावे श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले याप्रशसंगी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान कार्यालयामध्ये देवस्थानचे चेअरमन मा.महेश कल्याणराव इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र प्रतिमाप्रसाद देऊन आलेल्या सर्व पाहुण्यांचा  सत्कार केला.यावेळी बोलताना कारेगावच्या विद्यमान सरपंच निर्मला शुभम नवले म्हणाल्या स्वामींच्या कृपेने सरपंच पद ते  राष्ट्रवादी युवती काँग्रेस महाराष्ट्र राज्य आज पदावर मी विराजमान आहे. स्वामींच्या दर्शनानंतर मनाला शांती व समाधान मिळाले आहे व श्री स्वामी समर्थ देवस्थानचे नियोजन चेअरमन महेश कल्याणराव इंगळे मालक यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरीत्या चालू आहे.यावेळी त्यांच्यासोबत कब्बडीपट्टू सनत मांडगे,परीक्षित चौगुले, महेश स्वामी, कटारे, बंटी नारायणकर आदि उपस्थित होते.