Posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडे वस्ती- क्षेत्रभेटी अंतर्गत शैक्षणिक सहल.

Image
प्रतिनिधी -सोलापूर  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडे वस्ती- क्षेत्रभेटी अंतर्गत शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती त्यानिमित्ताने सोलापूर येथे- पार्ले जी बिस्कीट कंपनी ला प्रथम भेट देण्यात आली. त्यानंतर सोलापूरचे आराध्यैवत श्रीयोगी सिद्धरामेश्वर मंदिर या ठिकाणी भेट देण्यात आली.  मंदिराच्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, माजी मंत्री ,विद्यमान उत्तर सोलापूरचे आमदार श्री.विजयकुमार देशमुख साहेबांची  भेट झाली आणि मुलाबरोबर त्यांनी फोटो काढला आणि मुलांना शुभेच्छा दिल्या.त्यानंतर त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध असा आदिलशाच्या काळात बांधलेला भुईकोट किल्ला मुलांना दाखवण्यात आला .किल्ल्याबद्दल ऐतिहासिक माहिती देण्यात आली. मुलांनी किल्ल्यातील गार्डनमध्ये भरपूर आनंद घेतला आणि अनेक प्रकारचे खेळण्या होत्या त्यामुळे त्या खेळण्याचा आनंद मुलाने लुटला  त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद अत्यंत ओसंडून वाहत होता. भुईकोट किल्ल्यातील उपयुक्त माहिती मुलांना देण्यात आली आणि मुलाने प्रत्यक्ष किल्ले बघितले . -------------------------------------- ▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️...

दिल्ली कार्यशाळेसाठी सरपंच वर्षा सिध्दाराम भंडारकवठे यांची निवड ;अक्कलकोट तालुक्यातील एकमेव सरपंच.

Image
प्रतिनिधी-अक्कलकोट  आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या अनुषंगाने पंचायती राज मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने चार व पाच मार्च रोजी होणाऱ्या शासकीय कार्यशाळेसाठी अक्कलकोट तालुक्यातील चपळगावचे सरपंच वर्षा सिध्दाराम भंडारकवठे यांची निवड झाली आहे. दिल्ली येथील कार्यशाळेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ४० तर सोलापूर जिल्ह्यातून ७ महिला प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे.यामध्ये संपूर्ण अक्कलकोट तालुक्यातून  चपळगावच्या सरपंच वर्षा सिध्दाराम भंडारकवठे यांची एकमेव निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी ज्या ज्या सरपंचांची धडपड आहे अशा महिला प्रतिनिधींची निवड करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळके यांच्याकडून सांगण्यात आले.सदर निवडीबद्दल देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,खासदार प्रणिती शिंदे,खासदार धैर्यशील मोहिते पाटील,आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे,माजी सरपंच तथा उद्योजक उमेश पाटील, संस्थाध्यक्ष रविकांत पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आप्पासाहेब पाटील,बसवराज बाणेगांव, उपसरपंच सुवर्णा कोळ...

बसवराज पाटील यांच्या हस्ते बसवराज पेट्रोलियमचे उद्घाटन.....

Image
मुरूम, ता. २५ (प्रतिनिधी)   देशाला अधिक समृद्ध करण्यासाठी तरुणांनी नवनवीन व्यवसायाकडे वळले पाहिजे. त्यामुळे स्वतःच्या प्रगती बरोबरच देशाची ही प्रगती होते. सध्या पेट्रोल, डिझेल हे अत्यावश्यक झाल्याचे प्रतिपादन  उद्घाटन प्रसंगी  माजी राज्यमंत्री  बसवराज पाटील यांनी केले. मुरूम ता. उमरगा येथे भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडचे बसवराज पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचे उद्घाटन बसवराज पाटील यांच्या हस्ते सोमवारी (ता. २४) रोजी करण्यात आले. यावेळी  जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, सोलापूरचे सीनियर सेल्स मॅनेजर शाश्वत शर्मा, संस्कार गुप्ता, लोहारा पंचायत समितीचे माजी सभापती विश्वनाथ पत्रिके, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, सचिन राजनाळे, विश्वनाथ मुदकण्णा, अंकुश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.  पुढे बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, मुरूम हे शहर राष्ट्रीय महामार्गालगत आहे. त्यामुळे येथे दुचाकी, चार चाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या व्यवसायामुळे इथल्या ग्राहकांची सेवाच होणार आह...

महाशिवरात्रीनिमित्त वटवृक्ष मंदिरातील दिनक्रमात बदल- रात्री त्र १० ते १२ या वेळेत महापूजा व आरती.

Image
प्रतिनिधी -अक्कलकोट  सालाबादाप्रमाणे यंदाही येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी माघ वद्य त्रयोदशी रोजी महाशिवरात्री संपन्न होत आहे. महाशिवरात्रीनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील दिनचर्येत व स्वामींच्या नित्योपचारात पारंपारीक पध्दतीचे बदल करण्यात आले आहेत अशी माहिती मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. सालाबाद प्रमाणे सकाळी साडेअकरा वाजता नित्यनेमाने होणारी नैवेद्य आरती व रात्रीची शेजारती महाशिवरात्रीमुळे होणार नाही. महाशिवरात्री रोजी रात्री १० ते १२ या वेळेत पुरोहीत मोहन पुजारी व मंदार पुजारी यांच्या विधीवत मंत्रोच्चारात रुद्राभिषेक व महाशिवरात्रीची महापूजा होऊन रात्री बारा वाजता श्रींची आरती होईल याची सर्व स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी अशी माहीतीही महेश इंगळे यांनी याप्रसंगी दिली तसेच यावेळी सर्व भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाविकांना केले आहे. -------------------------------------- ▪️जनता संघर्ष न्यूज,सोलापूर▪️सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

संत निरंकारी मंडळाकडून मुरूमच्या जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या परिसराची स्वच्छता.

Image
मुरूम, ता. उमरगा येथील संत निरंकारी मंडळाकडून जिल्हा परिषद कन्या प्रशालेचा परिसर स्वच्छ करताना पुरुष व माता भगिनी.  मुरुम, ता. उमरगा, ता. २३ (प्रतिनिधी)  संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन, दिल्ली व मुरुम शाखेकडून संत निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या ७१ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून संपूर्ण जगात हा दिवस स्वच्छता मोहीम म्हणून साजरा केला जातो. सद्गुरु माता सुदिक्षा सविंदर हरदेवजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या कृपा आशीर्वादाने रविवारी (ता.२३) रोजी स्वच्छ चल स्वच्छ मन मोहिमेअंतर्गत जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरूम रोटरी क्लबच्या डॉ. सुवर्णा पाटील होत्या. यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, महाराष्ट्र पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, बालाजी व्हनाजे, मुख्याध्यापिका अलका गायकवाड,  नळदुर्गचे राजेंद्र पोतदार, प्रा. डॉ. महेश मोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कल्लेश्वर पांचाळ, रमेश मिणीयार, तुकाराम शेवाळे, सुरेश कोळी, सुधाकर नारायणकर, हनुमंत पोतदार, प्...