Posts

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर

Image
प्रतिनिधी- सोलापूर सोलापूर महानगरपालिका तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. पलोलू वाय. एच. हे कोरोना महामारी सुरु होण्या पुर्वीचे वैद्यकीय अधिकारी असुन त्यांनी कोरोना काळात तिन्ही लाटेत काम करून ही  त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील चुकीचे व असंबधीत कारणाने त्यांच्या वर अन्यायकारक कारवाई झाली असून त्यांची सर्व चौकशी पूर्ण झाली असून ते निर्दोष आहेत व सोलापूर शहर व जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे उच्चतम अधिकारी यांचे अभिप्राय व अहवाल व जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लोलु यांचे कामकाज नियमानुसार झाल्या चे प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांना म.न.पा आरोग्य विभाग मध्ये पुन्हा सेवेत सामावून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वैद्यकीय सेलचे महाराष्ट्र राज्य प्रभारी प्रा. राहुल बोळकोटे यांच्या वतीने सोलापूर चे नूतन पालकमंत्री ना. जयकुमार गोरे साहेबांना निवेदन देण्यात आले आहे. 8 यावेळी पालकमंत्र्यांनी या विषयी निश्चित चौकशी करून न्याय देण्यात येईल व सेवेत सामावण्याचे आदेश देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.यावेळी या शिष्टमंडळात सुर्यकांत शिवशरण, व्ही. डी. गायकवाड, बळीराम ए...

जिल्हा परिषद प्रशालेत स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम संपन्न.

Image
मुरूम, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद प्रशालेत स्टुडंट पोलीस कॅडेट प्रशिक्षणाप्रसंगी प्रशिक्षक व सर्व कर्मचारी मुरूम, ता. उमरगा, ता.३१ (प्रतिनिधी) स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यक्रम २०२५ अंतर्गत जिल्हा परिषद प्रशालेत बुधवारी (ता.२९)  रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलातर्फे विद्यार्थ्यांना विविध नियमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यात सायबर क्राईम (गुन्हे) बालकामगार, बालगुन्हेगारी, गुड टच, बॅड टच व रहदारी नियम, हेल्मेटचा वापर, वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, मोबाईलचा वापर कसा करावा याबाबतचे विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक एकबाल सय्यद यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस नाईक सारफळे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने, हरिभाऊ माकणे, मोहन राठोड, क्रांती कांबळे, राजू पवार, अविनाश कवाळे, बाळू कांबळे नागनाथ कामशेट्टी, संगिता घुले आदींची उपस्थिती होती.    -------------------------------------- ▪️ जनता संघर्ष न्यूज,सोलापूर ▪️ सिध्दार्थ भडकुंबे-संपादक 👉 ब...

वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानांतर्गत विविध स्पर्धेतील स्पर्धकांना प्रशस्तीपत्राचे वाटप

Image
माधवराव पाटील महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभियानांतर्गत बक्षीस वितरण करताना मान्यवर व विजेते स्पर्धक. मुरूम, ता. उमरगा, (प्रतिनिधी)  श्री माधवराव पाटील महाविद्यालय व माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभियानांतर्गत  बक्षीस वितरण कार्यक्रम मंगळवारी (ता. २८) रोजी पार पडला. या पंधरवड्यामध्ये महाविद्यालयातील ग्रंथालय विभागामार्फत वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन अशा विविध उपक्रमाद्वारे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना वाचन व लिखाणाची आवड निर्माण व्हावी म्हणून खुले ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी आवडेल त्या विद्यार्थ्यांना ग्रंथ व पुस्तके दिल्याने विद्यार्थ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. यावेळी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. सतिश शेळके, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, ग्रंथपाल डॉ. राजकुमार देवशेट्टे, डॉ. रवींद्र आळंगे, डॉ. महेश मोटे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. राम बजगिरे, डॉ. सुजित मटकरी, डॉ.  सायबण्णा घोड...

शाक्य संघ, यश सिध्दी माजी सैनिक आणि दक्षिण सदर परिसरातील शिक्षक हौसिंग सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानेशिक्षक हाऊसिंग सोसायटीत प्रजासत्ताक दिन साजरा.

Image
प्रतिनिधी-सोलापूर  शाक्य संघ, यश सिध्दी माजी सैनिक  आणि दक्षिण सदर परिसरातील शिक्षक हौसिंग सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि.२६ जानेवारी रोजी ७६ वा भारतीय प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी, शाक्य संघ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सोलापूर व यशसिध्दी आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक हौसिंग सोसायटीत प्रजासत्ताक दिन बिगुल वाजवून मानवंदना देऊन साजरा केला. यावेळी "संविधानाचा विजय असो", "प्रजासत्ताक दिनाचा विजय असो", "महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो", अशा जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. याप्रसंगी शिक्षक हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन प्रदीप ताकपिरे, सदस्य अंबादास कदम, शेखर शिवशरण, सुर्यकांत डावरे, प्रभाकर भालेराव, मंजुषा ताकपेरे, आनंद कांबळे, अरुण साबळे, कांचनगंगा डावरे, शशिकला ओहोळ, आशा गायकवाड, यशसिध्दी आजी माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवपुत्र घटकांबळे, मधुकर माने, सुर्यकांत गजघाटे, कमलाकर कांबळ...

संभाजी राजे ग्रुपच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग.

Image
  मुरूम, ता.उमरगा (प्रतिनिधी)  शहरातील छत्रपती संभाजी राजे ग्रुप चे सचिन पाटील शिंदे पाटील यांच्यातर्फे शनिवारी (ता. २५) रोजी हळदी-कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  या कार्यक्रमाला मुलांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब मुरूम सिटीच्या सदस्या डॉ.सुवर्णा पाटील होत्या.यावेळी मयुरी चौधरी,  रूपाली शिंदे, होम मिनिस्टर कार्यक्रमाचे  सादरकते प्रसाद मोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन उत्साहात कार्यक्रम पार पडला. संभाजी नगर येथे गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने सामाजिक कार्य करणारे सचिन शिंदे हे कौतुकास्पद कार्य करत असल्याचे यावेळी प्रसाद मोटे यांनी म्हटले. छत्रपती संभाजी राजे ग्रुपचे आकाश शिंदे, रतन मुडे, मोन्या राजपूत, बापू जाधव, सुमित शेळके, मल्लू तडकले, अक्षय शिंदे, सतीश मुदकन्ना, वैभव शिंदे, अभिजीत सूर्यवंशी, सुमित शिंदे, भैय्या धर्माधिकारी, सुमित पांढरे, सागर शिंदे, बंटी राजपूत, भरत घोडके, जिगर पवार, शिवराज गिरीबा, विकास शिंदे आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रस्...