सोमपा वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लोलु यांच्या साखळी उपोषणास विविध क्षेत्रातील मान्यवरांचा जाहीर पाठींबा.

सोमपा वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लोलु यांच्या साखळी उपोषणास विविध क्षेत्रातील मान्यवरांचा जाहीर पाठींबा. प्रतिनिधी-सोलापूर सोलापूर महानगरपालिका माजी सभागृह नेते तथा नगरसेवक देवेंद्र भंडारे,नरसिंग कोळी, जेम्स जंगम,व सोमपा आरोग्य निरीक्षक संघटना अध्यक्ष शेषराव शिरसट यांनी सोमपा वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लोलु यांच्या न्याय, हक्क व अधिकार मागणीस पुनम गेट आंदोलन स्थळी भेट व पाठिंबा जाहीर दिला आहे. जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ लष्कर सोलापूर चे अध्यक्ष करेपा अण्णा जंगम यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या समाज संचलित जांबमुनी प्रशालेचे माजी सेक्रेटरी व जांबमुनी प्राथमिक शाळेचे माजी चेअरमन तथा सोमपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलु वाय. एच.यांच्यावर कोरोना काळात नियुक्ती नसलेले नियमबाह्य व चुकीचे कारणामुळे ,कार्यक्षेत्राबाहेरील , वालचंद काँलेज काँरटाईन सेंटरच्या कामाशी संबंध येत नसतानाही त्यातील डॉ. व कर्मचारी यांना जबाबदार न धरता ,मनपा प्रशासन ने षडयंत्र करून तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लोलु यांची चौकशी न करता व समिती गटीत करून अहवाल न घेता,शहानिशा न करता व आरोग्य अधिकार...