Posts

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना , महासंघ जाहीर आभार-प्राध्यापक-सुनील पूर्णपात्रे उपाध्यक्ष-महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना, महाराष्ट्र.

Image
महाराष्ट्र  राज्य कनिष्ठ  महाविद्यालय शिक्षक संघटना , महासंघ जाहीर आभार. प्राध्यापक-सुनील पूर्णपात्रे उपाध्यक्ष-महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना, महाराष्ट्र. प्रतिनिधी - सोलापूर सर्व  कनिष्ठ महाविद्यालयीन  प्राध्यापक बंधू  भगिनींना  नमस्कार,              महाराष्ट्र  राज्य  कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या  आदेशानुसार दि. २१ फेब्रुवारी २०२४  पासून  बारावी  बोर्ड परीक्षेच्या  पेपर  तपासणीवर आपण सर्वांनी बहिष्कार  टाकला  व  तो कालपर्यंत यशस्वी  केला  याबद्दल  तुम्हां  सर्वांचे  तसेच  सर्व तालुका संघटना पदाधिकारी, सर्व जिल्हा संघटना पदाधिकारी, विभागीय संघटना पदाधिकारी   यांचे प्रथमतः महासंघाच्या तर्फे  हार्दिक  अभिनंदन  व  आभार. काल शिक्षण मंत्री मा. दीपकजी केसरकर यांनी महासंघाच्या  नियामक मंडळाला चर्चेसाठी बोलाविले होते. सकाळी ९ ते ११:३०या दरम्यान पदाधिकारी सोबत महासंघाच्या मागण्याबाब...

फेन्सर्स स्पोर्ट्स फाऊंडेशन, मुंबई आयोजित राजमाता जिजाऊ पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न.

Image
  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच पदक प्राप्त खेळाडूंच्या मातांचा “राजमाता जिजाऊ पुरस्कार“ देऊन सन्मान करण्याचा आगळावेगळा दिमाखदार सोहळा नुकताच नालंदा कॉलेज, गोराई येथे संपन्न झाला. फेन्सर्स स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि नालंदा कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने विविध मान्याताप्राप्त खेळामधील अत्युच्च कामगिरी करणाऱ्या पन्नास खेळाडूंच्या मातांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून माजी तालुका क्रीडा अधिकारी सौ.संजीवनी पूर्णपात्रे मँडम, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नालंदा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.कल्पना गायकवाड मँडम, तसेच डी एड कॉलेज च्या प्राचार्या सौ. पद्मा शेरेकर मँडम, लाँ कॉलेज चे प्राचार्य मिलिंद गजदाने सर, क्रीडा शिक्षक मोहन चौधरी सर, सुधीर जमदाडे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना संजीवनी पूर्णपात्रे मँडम यांनी  फेन्सर्स स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या या प्रेरणात्मक उपक्रमाचे कौतुक करून खेळाडू व मातांच्या कार्याबद्दल गौरवोद्गगार काढले. वरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी जान्हवी राव, शुभम मालवणकर, नरेंद्र तभाने, मंदार...

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर.

Image
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर . प्रतिनिधी- सोलापूर   राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात सन २०२३ अखेर राज्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बाजी मारली आहे.राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविण्यात सोलापूर जिल्हा अग्रेसर असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले यांचे राज्य स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.  राज्यात आरोग्य विभागांतर्गत जवळपास ३५ उपक्रमांचे सर्व जिल्ह्यांचे मुल्यांकन केले जाते.यामध्ये माता आरोग्य , बाल आरोग्य , लसीकरण , क्षयरोग दुरीकरण,कृष्ठरोग शोध मोहिम , असंसर्गीय आजार प्रतिबंधात्मक , आयुष्यमान भारत , गुणवत्ता आश्वासन , कुटूंब कल्याण ,आर्थिक खर्चाचा आढावा नियोजन , मनुष्यबळ माहिती अद्ययावत करणे , टेली कन्सल्टेशन , राष्ट्रीय नागरी अभियान अंतर्गत वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, साथरोग नियंत्रण कार्यक्रम आदी उपक्रमांचा समावेश आहे.यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग राज्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त धिरजकु...

अक्कलकोट येथील मंगरूळे हायस्कूल येथे त्रिशरण फाउंडेशनची कार्यशाळा संपन्न.

Image
प्रतिनिधी - अक्कलकोट   अक्कलकोट,दक्षिण सोलापूर  सोलापूर शहरासह जिल्ह्यात त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशने या संस्थेने किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासाठी मासिकपाळी प्रशिक्षण व समुपदेशन अभियान राबविले. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या या विशेष उपक्रमात ७५ कार्यशाळा घेण्यात आल्या यांचा २२५० विद्यार्थिनींना लाभ मिळाला.यांची सांगता समारोप अक्कलकोट येथील मंगरूळे हायस्कूल येथे करण्यात आले. मंद्रूप येथील महात्मा गांधी भवनमध्ये ७ डिसेंबरला किशोरवयीन मुलींसाठी मासिकपाळी प्रशिक्षण व समुपदेशन कार्यशाळेची सुरूवात करण्यात आली. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी व त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा वाघमारे यांच्या हस्ते झाले. याच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिता कोरे होत्या. यावेळी महापारेषणचे अधीक्षक अभियंता राम शेळके, नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, फाउंडेशनचे राज्य समन्वयक प्रशांत वाघमारे, संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कदम, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे...

पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर अध्यक्ष पदी सारा न्यूज चे संपादक राम हुंडारे यांची नियुक्ती..

Image
सोलापूर - प्रतिनिधी पत्रकार सुरक्षा समितीची सोलापूर येथे बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ पत्रकार आन्सर तांबोळी(B.S)शेठ होते. यावेळी राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेल्या अनेक वर्षापासून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे पत्रकारांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती देणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने आंदोलन उपोषण निवेदन त्याच बरोबर पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून पत्रकारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आ...