फेन्सर्स स्पोर्ट्स फाऊंडेशन, मुंबई आयोजित राजमाता जिजाऊ पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच पदक प्राप्त खेळाडूंच्या मातांचा “राजमाता जिजाऊ पुरस्कार“ देऊन सन्मान करण्याचा आगळावेगळा दिमाखदार सोहळा नुकताच नालंदा कॉलेज, गोराई येथे संपन्न झाला. फेन्सर्स स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि नालंदा कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने विविध मान्याताप्राप्त खेळामधील अत्युच्च कामगिरी करणाऱ्या पन्नास खेळाडूंच्या मातांना राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून माजी तालुका क्रीडा अधिकारी सौ.संजीवनी पूर्णपात्रे मँडम, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नालंदा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.कल्पना गायकवाड मँडम, तसेच डी एड कॉलेज च्या प्राचार्या सौ. पद्मा शेरेकर मँडम, लाँ कॉलेज चे प्राचार्य मिलिंद गजदाने सर, क्रीडा शिक्षक मोहन चौधरी सर, सुधीर जमदाडे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना संजीवनी पूर्णपात्रे मँडम यांनी फेन्सर्स स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या या प्रेरणात्मक उपक्रमाचे कौतुक करून खेळाडू व मातांच्या कार्याबद्दल गौरवोद्गगार काढले.
वरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी जान्हवी राव, शुभम मालवणकर, नरेंद्र तभाने, मंदार कुलकर्णी यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी फेन्सर्स स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक केदार ढवळे यांनी उपस्थित मान्यवर तसेच सर्व पुरस्कार्थी यांचे आभार मानले.
👉संपादक-सिध्दार्थ भडकुंबे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9579838240
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240