महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना , महासंघ जाहीर आभार-प्राध्यापक-सुनील पूर्णपात्रे उपाध्यक्ष-महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना, महाराष्ट्र.

महाराष्ट्र  राज्य कनिष्ठ  महाविद्यालय शिक्षक संघटना , महासंघ जाहीर आभार.
प्राध्यापक-सुनील पूर्णपात्रे
उपाध्यक्ष-महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना, महाराष्ट्र.
प्रतिनिधी-सोलापूर
सर्व  कनिष्ठ महाविद्यालयीन  प्राध्यापक बंधू  भगिनींना  नमस्कार,
             महाराष्ट्र  राज्य  कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या  आदेशानुसार दि. २१ फेब्रुवारी २०२४  पासून  बारावी  बोर्ड परीक्षेच्या  पेपर  तपासणीवर आपण सर्वांनी बहिष्कार  टाकला  व  तो कालपर्यंत यशस्वी  केला  याबद्दल  तुम्हां  सर्वांचे  तसेच  सर्व तालुका संघटना पदाधिकारी, सर्व जिल्हा संघटना पदाधिकारी, विभागीय संघटना पदाधिकारी   यांचे प्रथमतः महासंघाच्या तर्फे  हार्दिक  अभिनंदन  व  आभार.
काल शिक्षण मंत्री मा. दीपकजी केसरकर यांनी महासंघाच्या  नियामक मंडळाला चर्चेसाठी बोलाविले होते. सकाळी ९ ते ११:३०या दरम्यान पदाधिकारी सोबत महासंघाच्या मागण्याबाबत चर्चा झाली. या चर्चेनंतर महासंघाने पेपर तपासणीवरील यशस्वी बहिष्कार मागे घेतला.अनेक शिक्षक संघटना वेगवेगळे मागण्यासाठी आंदोलन करत असते परंतु त्यांच्या शिक्षण मंत्री,सचिव व मंत्रालय पातळीवर साधी चर्चाही होत नाही, ही वस्तुस्थिती सर्वांनी अवगत करावी.कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघ सातत्याने आंदोलन करते व काहीतरी मागण्या मान्य करते हेच आपले आंदोलनाचे मोठे यश आहे.‌ एवढेच नाही तर शासनाला आपले प्रश्न मांडणे व ते प्रश्न जागृत ठेवणे हे काम कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघ करते,जे की विधिमंडळातील सभागृहात सदस्यांनी करणे अपेक्षित आहे.‌
आपले प्रश्न जिवंत ठेवण्यासाठी व ते येणाऱ्या काळात मान्य करून घेण्यासाठी  " महासंघ " तत्पर आहे हे आपण वेळोवेळी दाखवून दिलेले आहे.
          असाच आत्मविश्वास आपण सर्वांनी ठेवावा,अशीच एकजूट भविष्यात कायम राखावी,  ही नम्र विनंती. बहिष्कार आंदोलन काळात आपण सर्वांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला होता व तो यशस्वी केलात्याबद्दल पुन्हां एकदा सर्वांनाच धन्यवाद.
'एकीचे बळ  मिळते सर्वांनाच फळ'..!
----------------------------------




Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर