राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर.

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात सोलापूर जिल्हा राज्यात अग्रेसर.
प्रतिनिधी- सोलापूर  
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात सन २०२३ अखेर राज्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बाजी मारली आहे.राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविण्यात सोलापूर जिल्हा अग्रेसर असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले यांचे राज्य स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. 
राज्यात आरोग्य विभागांतर्गत जवळपास ३५ उपक्रमांचे सर्व जिल्ह्यांचे मुल्यांकन केले जाते.यामध्ये माता आरोग्य , बाल आरोग्य , लसीकरण , क्षयरोग दुरीकरण,कृष्ठरोग शोध मोहिम , असंसर्गीय आजार प्रतिबंधात्मक , आयुष्यमान भारत , गुणवत्ता आश्वासन , कुटूंब कल्याण ,आर्थिक खर्चाचा आढावा नियोजन , मनुष्यबळ माहिती अद्ययावत करणे , टेली कन्सल्टेशन , राष्ट्रीय नागरी अभियान अंतर्गत वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, साथरोग नियंत्रण कार्यक्रम आदी उपक्रमांचा समावेश आहे.यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग राज्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.याबाबत राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त धिरजकुमार यांनी लेखी पत्रान्वये सोलापूर जिल्हा प्रथम असल्याचे कळविण्यात आले आहे.
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविण्यात पहिले सोलापूर जिल्ह्याला ४३.१२ गुण आहेत.तर सांगली जिल्हा  ४२.४६, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा ४१.६, इतके गुण प्राप्त करुन पहिल्या तीन क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
१)आरोग्य विभागामधील सर्व तालुका अधिकारी , वैद्यकीय अधिकारी व जिल्हा स्तरीय आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या नियमित आढावा बैठका घेऊन ग्रामीण भागातील जनतेला लोकाभिमुख आरोग्य सेवा गुणवत्तेने देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.तसेच सन २०२४-२५ मध्येही सोलापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग राज्यात अग्रस्थानी ठेवणार आहे - मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे.
२.राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला प्रथम क्रमांकाचा सन्मान हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांचे मार्गदर्शन व आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे.यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्नशिल आहे.
- डॉ.संतोष नवले जिल्हा आरोग्य अधिकारी.
---------------------------------------




Comments

Popular posts from this blog

इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक' इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार.

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेत नवागतांचा प्रवेशोत्सव संपन्न...

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर