इनरव्हील क्लब ऑफ सोलापूर हार्मनी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेस बोअरवेल मारून देणार.

इनरव्हील क्लब ऑफ सोलापूर हार्मनी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर शाळेस बोअरवेल मारून देणार. प्रतिनिधी-अक्कलकोट दि. २६/१०/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर मध्ये शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोतदार सर यांच्या प्रयत्नांतून शाळेचा बदललेला चेहरा मोहरा पाहण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ सोलापूर हार्मनी यांच्या तृषा गुप्ता मॅडम (अध्यक्ष ), अनुराधा चांडक मॅडम (माजी असोसिएशन सचिव आणि माजी जिल्हा अध्यक्ष), लक्ष्मी चव्हाण मॅडम ( झोनल सबऑर्डिनेटर), हेमा काबरा मॅडम ( ई ॲडमिन) यांनी शाळेला भेट दिली. शाळेला भेट देत असताना शाळेतील परसबागेचे विशेष कौतुक त्यांनी केले. शाळेचे पदवीधर शिक्षक श्री. दिनकर भारती यांनी तयार केलेल्या QR code चे विशेष कौतुक त्यांनी सदर प्रसंगी केले. सर्वांनी आपल्या मनोगतातून व्यक्त होताना सांगितले की, शाळेचा परिसर आमच्या मनाला खूप भावला.तसेच शाळेतील मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री साक्षी स्वामी आणि उपमुख्यमंत्री नवेता पाटील यांच्याशी हितगुज करत विशेष कौतुक केले तसेच प्रत्येक विभागाचे कामकाज कसे चालते यासंदर्भात हिजगुज केले.शाळेत सुरू असलेल्या विद्यार्थी बचत बँकेचे...