हुकूमशाही भाजप सरकार विरुद्ध अखिल भारतीय किसान सभेचा एल्गार...!
जनता संघर्ष न्यूज -(प्रतिनिधी-सोलापूर)
प्रतिनिधी सोलापूर : -कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलना दरम्यान उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यात घडलेल्या हिंसाचार प्रकरणानं देशाला हादरवुन सोडले आहे. या घटनेत भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर शेतकरी आंदोलकांच्या अंगावर गाडी चढवून चार शेतकऱ्यांची हत्या केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आलाय.उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा व कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चार शेतकऱ्यांना चिरडून ठार मारले. या घटनेत बारापेक्षा अधिक शेतकरी गंभीररित्या जखमी झाले आहेत.सबंध देशभरातून या अमानुष कृत्याचा जाहीर निषेध होत आहे. तशाच स्वरूपाचा निषेध सोलापूरात 'सिटू'च्या वतीने देखील करण्यात आला आहे.
संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्याच्या विरोधातील तीन केंद्रीय काळे कायदे रद्द करा व किफायतशीर आधार भावाचा केंद्रीय कायदा करा या प्रमुख मागण्यासाठी दिल्लीत दहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत.आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या उपमुख्यमंत्री व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांना सभा स्थळाकडे जात असताना काळे झेंडे दाखवण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उभे होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने व त्याच्या गुंडांनी शेतकऱ्यांना शांततामय आंदोलन करत असताना त्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडून टाकले. भारतीय शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातील ही अत्यंत निंदनीय घटना आहे. त्यामुळे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू)या क्रूर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे असे मत सिटूचे राज्य सचिव कॉ.युसुफ शेख (मेजर) यांनी व्यक्त केले. मंगळवार दि. ५ ऑक्टोबर २०२१ रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने देशभर या घटनेच्या निषेधार्थ निदर्शन कार्यक्रम करण्यात आले. त्याच अनुषंगाने सोलापुरातही अखिल भारतीय महिला जनवादी संघटनेच्या राज्याध्याक्षा नसीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली मा. जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन गेट याठिकाणी निदर्शने करण्यात आली.
Comments
Post a Comment
जनता संघर्ष हे ब्लॉग विशेष बातमीपत्रासह सामाजिक , संस्कृतिक,शैक्षणिक,राजकीय , आरोग्य,क्रीडा व मनोरंजन यासह विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे .
आपण भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा....
बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क-9579838240