हुकूमशाही भाजप सरकार विरुद्ध अखिल भारतीय किसान सभेचा एल्गार...!
जनता संघर्ष न्यूज -(प्रतिनिधी-सोलापूर) प्रतिनिधी सोलापूर : -कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलना दरम्यान उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यात घडलेल्या हिंसाचार प्रकरणानं देशाला हादरवुन सोडले आहे. या घटनेत भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर शेतकरी आंदोलकांच्या अंगावर गाडी चढवून चार शेतकऱ्यांची हत्या केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आलाय.उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा व कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चार शेतकऱ्यांना चिरडून ठार मारले. या घटनेत बारापेक्षा अधिक शेतकरी गंभीररित्या जखमी झाले आहेत.सबंध देशभरातून या अमानुष कृत्याचा जाहीर निषेध होत आहे. तशाच स्वरूपाचा निषेध सोलापूरात 'सिटू'च्या वतीने देखील करण्यात आला आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्याच्या विरोधातील तीन केंद्रीय काळे कायदे रद्द करा व किफायतशीर आधार भावाचा केंद्रीय कायदा करा या प्रमुख मागण्यासाठी दिल्लीत दहा महिन्यापेक्...