इंगळगी येथे वि गु शिवदारे यांचा जन्मदिन उत्साहात साजरा.जयंतीनिमित्त एम.के.फाऊंडेशन तर्फे शिवदारे प्रशालेत वह्या वाटपाचा कार्यक्रम.

इंगळगी येथे वि गु शिवदारे यांचा जन्मदिन उत्साहात साजरा.जयंतीनिमित्त एम.के.फाऊंडेशन तर्फे शिवदारे प्रशालेत वह्या वाटपाचा कार्यक्रम. सहकारमहर्षी वि गु शिवदारे यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त इंगळगी ( ता.दक्षिण सोलापूर)येथील वि गु शिवदारे प्रशालेत एम.के.फाऊंडेशन तर्फे वह्या वाटप करताना महादेव कोगनुरे, संभाजी माने,इनोंदगी कोटे, चंद्रकांत गुरव, यल्लपा कोरे, श्रीशैल देशमुख, विजयकुमार बरबडे,सरपंच विनोद बनसोडे आदी. प्रतिनिधी-सोलापूर सहकार क्षेत्रातील कार्यामुळेच वि गु शिवदारे यांना सहकारमहर्षी म्हणून लोक सन्मानित करत असत.सहकारमहर्षी स्वर्गीय विरुपक्षप्पा गुरप्पा शिवदरे यांना लोक प्रेमाने शिवदारे आण्णा म्हणून ओळखत होते. एक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व थोर सामाजिक कार्यकर्ते म्हणून शिवदारे आण्णा हे परिचित होते. आण्णांच्या या सहकार क्षेत्रातील योगदानामुळेच लोक त्यांना सहकारमहर्षी म्हणून सन्मानित करत असल्याचे मत एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा जनसेवक महादेव कोगनुरे यांनी येथे बोलताना व्यक्त केले. सहकारमहर्षी वि गु शिवदारे यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त इंगळगी( ता.दक्षिण,सोलापूर )येथील वि गु शिवदार...