Posts

जेऊरवाडी येथील नूतन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्रीदेवी राठोड निवड.

Image
जेऊरवाडी येथील नूतन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्रीदेवी राठोड निवड. प्रतिनिधी - अक्कलकोट जि.प.प्रा मराठी शाळा जेऊरवाडी येथील नूतन शालेय व्यवस्थापन समिती कार्यकारिणी पुनर्गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी श्रीदेवी राठोड तर उपाध्यक्षपदी सुनिल राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक त्रिभुवन जाधव उपस्थित होते.मुख्याध्यापक त्रिभुवन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पालकांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. यावेळी सदस्यपदी रवी पवार,प्रकाश चव्हाण,कविता राठोड, सचिन राठोड,सविता राठोड,महादेवी जाधव,कविता किसन राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर प्रसंगी नामदेव राठोड,गोविंद चव्हाण,विजय राठोड,रमेश कोळी,संजय जाधव,अक्षय राठोड,अनिल राठोड,आदी उपस्थित होते. ------------------------------------ ▪️जनता संघर्ष न्यूज ▪️ संपादक-सिध्दार्थ भडकुंबे ▪️ बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

अक्कलकोट तालुक्यातील करजगी गावचे मा.ॲड.दयानंद उंबरजे यांची जेऊर गावातील १४ गणेशोत्सव मंडळाला सदिच्छा भेट व श्री गणेशाचे पूजन.

Image
प्रतिनिधी - अक्कलकोट अक्कलकोट तालुक्यातील करजगी गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मा.श्री.ॲड.दयानंद उंबरजे साहेब यांनी  गणेशोत्सवानिमित्त  रविवार दि. २४/९/२०२३ रोजी जेऊर गावातील सर्व गणेशोत्सव मंडळांना सदिच्छा भेट देऊन श्री गणरायाच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी जेऊर गावातील युथ क्लब मंडळ,गुरुमूर्तेश्वर तरुण मंडळ,काशीविश्वेश्वर गणेशोत्सव तरुण मंडळ,चौडेश्वरी तरुण मंडळ,बमलिंगेश्वर तरुण मंडळ,अष्टविनायक तरुण मंडळ,पी.आर.के तरुण मंडळ,बसवनगर,गुरु म्हांतेश्वर तरुण मंडळ,शंकरलिंग तरुण मंडळ,जय हनुमान तरुण मंडळ, श्रीओम गणेश तरुण मंडळ,बालमित्र तरुण मंडळ आदी.गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेश पूजनाचा मान मा.ॲड.दयानंद उंबरजे यांना प्राप्त झाला.एका दिवसात तब्बल १४ गणेशोत्सव मंडळातील श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन ॲड.दयानंदउंबरजे साहेबांनी केले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मा.ॲड.दयानंद उंबरजे म्हणाले की,आज जेऊर गावातील सर्व गणेशोत्सव मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मला जो श्री गणरायाच्या पूजनाचा मान  दिला तसेच सर्वांनी माझ्यावरती दाखविलेले प्रेम,निष्ठा व विश्वास तसेच आपल्या सर्व मंडळाकडू...

सुवर्णाताई झाडे यांची महिला सुरक्षा संघटनेच्या सोलापूर शहर जिल्हा प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल गुरववाडीचे सरपंच म्हाळप्पा पुजारी यांच्या हस्ते सत्कार.

Image
प्रतिनिधी - सोलापूर महिला सुरक्षा संघटना नवी दिल्ली भारत सरकार मान्यता प्राप्त पद नियुक्तीचा कार्यक्रम सोलापूर येथे संपन्न झाला.दरम्यान उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई झाडे-खेलबुडे यांची महिला सुरक्षा संघटनेच्या सोलापूर शहर जिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडीचे विकासरत्न तथा सरपंच म्हाळप्पा पुजारी यांनी मार्डी येथील सुवर्णाताई झाडे यांच्या स्वगृही सदिच्छा भेट देऊन त्यांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी गणेशोत्सवानिमित्त प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या सुवर्णाताई झाडे यांच्या स्वगृघरातील गणरायाच्या प्रतिमेचे पूजन सरपंच म्हाळाप्पा पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.तदनंतर सुवर्णाताई झाडे व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी सरपंच म्हाळप्पा पुजारी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला. ------------------------------------ ▪️जनता संघर्ष न्यूज ▪️ संपादक-सिध्दार्थ भडकुंबे ▪️ बातम्या व जाहिरातीसा...

गुरववाडी गावचे विकासरत्न तथा सरपंच म्हाळप्पा पुजारी यांची स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनेल कार्यालयास सदिच्छा भेट.

Image
प्रतिनिधी - सोलापूर अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडी गावचे विकासरत्न तथा  सरपंच म्हाळप्पा पुजारी यांनी स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.तसेच श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन सरपंच म्हाळप्पा पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे संपादक वाघ साहेब यांच्या शुभहस्ते सरपंच म्हाळप्पा पुजारी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी म्हाळप्पा पुजारी यांनी स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सारा न्यूज नेटवर्क चे संपादक तथा पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहराध्यक्ष राम हुंडारे, जी.के मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष (दादा)गायकवाड,सिध्दार्थ भडकुंबे आदी उपस्थित होते. ------------------------------------ ▪️जनता संघर्ष न्यूज ▪️ संपादक-सिध्दार्थ भडकुंबे ▪️ बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-९५७९८३८२४०

सर्व समावेशक कार्य प्रणालीमुळे महेश इंगळे आयकॉन पुरस्काराचे मानकरी-स्विमिंग ग्रुपच्या शिवशंकर बिंदेगेंचे मनोगत.

Image
महेश इंगळे यांचा सत्कार करताना संतोष पराणे, शिवशंकर बिंदगे, श्रीकांत झिपरे व अन्य सदस्य दिसत आहेत. प्रतिनिधी   - अक्कलकोट   श्री स्वामी समर्थांचे भक्त राज्यभरासह देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. अनेक स्वामी भक्त हे नियमीतपणे स्वामींच्या दर्शनाकरिता येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येत असतात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने महेश इंगळे हे अत्यंत समर्पित वृत्तीने आपले जीवन देवस्थान करिता समर्पित करून स्वामी भक्तांच्या सेवेत अहोरात्र झटत आहेत. भाविकांना वेळोवेळी सर्वोत्तम सोई सुविधा व उत्तम दर्शन नियोजन करून कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त स्वामी भक्त कसे स्वामींचे दर्शन घेतील याकडे महेश इंगळे यांचा नेहमीच कटाक्षाने लक्ष असतो. त्यामुळे ते स्वतः स्वामींच्या सेवेत आपले जीवन समर्पित करून भाविकांना नेहमीच सुलभ स्वामी दर्शन व्हावे याकरिता वेळोवेळी विविध नियोजन करीत असतात.तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार धार्मिक आधी सर्वच क्षेत्रात सतत कार्य करण्याच्या उमेदीने झटत आहेत. त्यातच श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान सारख्या राज्यातील महत्त्वाच्या देवस्थानची जबाबदारीत स्वा...