Posts

Showing posts from February, 2024

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना , महासंघ जाहीर आभार-प्राध्यापक-सुनील पूर्णपात्रे उपाध्यक्ष-महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना, महाराष्ट्र.

Image
महाराष्ट्र  राज्य कनिष्ठ  महाविद्यालय शिक्षक संघटना , महासंघ जाहीर आभार. प्राध्यापक-सुनील पूर्णपात्रे उपाध्यक्ष-महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना, महाराष्ट्र. प्रतिनिधी - सोलापूर सर्व  कनिष्ठ महाविद्यालयीन  प्राध्यापक बंधू  भगिनींना  नमस्कार,              महाराष्ट्र  राज्य  कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या  आदेशानुसार दि. २१ फेब्रुवारी २०२४  पासून  बारावी  बोर्ड परीक्षेच्या  पेपर  तपासणीवर आपण सर्वांनी बहिष्कार  टाकला  व  तो कालपर्यंत यशस्वी  केला  याबद्दल  तुम्हां  सर्वांचे  तसेच  सर्व तालुका संघटना पदाधिकारी, सर्व जिल्हा संघटना पदाधिकारी, विभागीय संघटना पदाधिकारी   यांचे प्रथमतः महासंघाच्या तर्फे  हार्दिक  अभिनंदन  व  आभार. काल शिक्षण मंत्री मा. दीपकजी केसरकर यांनी महासंघाच्या  नियामक मंडळाला चर्चेसाठी बोलाविले होते. सकाळी ९ ते ११:३०या दरम्यान पदाधिकारी सोबत महासंघाच्या मागण्याबाब...